आदिवासींनी मिशन स्वरूपात संघटित होऊन संघर्ष करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:44+5:302021-06-22T04:24:44+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य व आदिवासी जनतेपर्यंत संविधानातील तरतुदी व आपले हक्क-अधिकार यासंदर्भात जागृती होऊन त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता ...

आदिवासींनी मिशन स्वरूपात संघटित होऊन संघर्ष करावा
गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य व आदिवासी जनतेपर्यंत संविधानातील तरतुदी व आपले हक्क-अधिकार यासंदर्भात जागृती होऊन त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता यावा या हेतूने संविधान जागर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून २० जून रोजी संध्याकाळी आभासी मंचच्या माध्यमातून देशातील चार राज्यांत सरकारचे वकील म्हणजे महाधिवक्ता असलेले ॲड. गोरकेला यांनी आपले विचार मांडले. संविधान जागर फाउंडेशनचे संयोजक सूरज कोडापे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आदिवासी समाजाने आता बौद्धिक विकासावर भर द्यायला पाहिजे, तेव्हाच समाजविकास घडून येईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कृतिका यांनी केले. आभार धर्मानंद मेश्राम यांनी मानले.
बाॅक्स
त्रिसूत्रीचा अवलंब करावा
आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी ॲड. गोरकेला यांनी त्रिसूत्री कार्यक्रम सांगितला. यावेळी ते म्हणाले, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे, सर्वोच्च न्यायालयासारख्या न्यायसंस्थेत वकिली करावी. याबरोबरच बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांच्याप्रमाणे मिशनरी होऊन समाजाच्या विकासासाठी त्या ध्येयाकडे प्रवास करावा, तेव्हाच आदिवासी समाज खऱ्या अर्थाने इतर आधुनिक समाजाप्रमाणे पुढे येऊ शकेल.