शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनी लुटला विमान प्रवासाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

कारवाफा आश्रमशाळेने ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथे सहलीचे आयोजन केले होते. नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी विमानाने केला. यातील सर्वच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विमान प्रवास तर सोडाच विमानतळ सुध्दा बघितले नव्हते. सहलीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना विमानाचा प्रवास करण्याचा आनंद लुटता आला. मुंबई येथे गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी गेट वे आॅफ इंडिया, हॉटेल ताजला भेट दिली.

ठळक मुद्देकारवाफा आश्रमशाळेचे विद्यार्थी : मुंबई येथे शैक्षणिक सहल; विविध स्थळांना दिल्या भेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या कारवाफा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या ३५ विद्यार्थ्यांनी विमानवारीचा अनुभव घेतला आहे.
आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या विकसीत जगाची माहिती व्हावी, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाने शैक्षणिक सहल हा उपक्रम यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात सुरू केला. गडचिरोली प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या पोटेगाव, कारवाफा, मार्र्कंडादेव, भाडभिडी, रेगडी या पाच आश्रमशाळांची शैक्षणिक सहलीसाठी निवड केली. आदिम जमाती विकास योजनेंतर्गत प्रत्येक आश्रमशाळेला १ लाख ७७ हजार रुपयांचा निधी तत्कालीन प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी निवड करायची व सहलीचे नियोजन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली होती. शैक्षणिक सहलीसाठी निवड करण्यासाठी शाळास्तरावर इयत्ता ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड करण्यात आली. पोटेगाव, मार्र्कंडादेव, भाडभिडी येथील विद्यार्थ्यांनी नागपुरातील विवधि स्थळांना भेटी दिल्या.
कारवाफा आश्रमशाळेने ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथे सहलीचे आयोजन केले होते. नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी विमानाने केला. यातील सर्वच विद्यार्थ्यांनी आजपर्यंत विमान प्रवास तर सोडाच विमानतळ सुध्दा बघितले नव्हते. सहलीच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना विमानाचा प्रवास करण्याचा आनंद लुटता आला. मुंबई येथे गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी गेट वे आॅफ इंडिया, हॉटेल ताजला भेट दिली. तसेच समुद्रात बोटीने प्रवासाचा आनंद लुटला. नेहरू तारामंडलला भेट देऊन खगोलशास्त्र, विज्ञान या विषयांची माहिती घेतली. ५ डी मॅजिक शोचा थरारही अनुभवला. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाला भेट देऊन ऐतिहासिक व भौगोलिक माहिती जाणली. जुहू चौपाटीवर समुद्रातील लाटांचा आनंद लुटला. कारवाफा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्यंकटेश चाचरकर, शिक्षक विष्णू चव्हाण, निर्मला हेडो, सुशील वकेकार, पुष्पा चव्हाण हे विद्यार्थ्यांसोबत होते. सदर सहल एपीओ विकास राचेलवार, सुधाकर गौरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित केली.

मुंबई बघून आश्चर्यचकीत झाले विद्यार्थी
मुंबई शहरातील टोलेजंग इमारती तसेच या शहरातील विविध वास्तू बघून सहलीला जाणारे विद्यार्थी आश्चर्यचकीत झाले. बहुतांश विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर गेले नव्हते. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चक्क विमानप्रवास व मुंबई, नागपूर शहर बघण्याची संधी उपलब्ध झाली. मुंबईतील वर्दळ, कारखाने, हॉटेल बघून विद्यार्थी आश्चर्यचकीत झाले.

टॅग्स :Studentविद्यार्थी