शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आदिवासींनी गोंडी संस्कृती जपावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:03 PM

गोंडियन महिलांनी गोंडी संस्कृतीचे जतन करून त्याचे पालन करावे तसेच आदिवासी गोंडी संस्कृती जपावी, असा सूर इंदौरच्या साहित्यिका तथा गोंडी धर्म प्रचारिका सुशीला धुर्वे व मान्यवरांनी काढला.

ठळक मुद्दे मान्यवरांचा सूर : राज्यस्तरीय संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : गोंडियन महिलांनी गोंडी संस्कृतीचे जतन करून त्याचे पालन करावे तसेच आदिवासी गोंडी संस्कृती जपावी, असा सूर इंदौरच्या साहित्यिका तथा गोंडी धर्म प्रचारिका सुशीला धुर्वे व मान्यवरांनी काढला.लगाम येथे इलाखा ग्रामसभा तर्फे आयोजीत राज्यस्तरीय गोंडी धर्म संमेलन व सामाजिक प्रबोधन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आदिवासी महिलांना इतर धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र महिलांनी आपल्या घरी मुलांना पेरसापेनबद्दल माहिती देऊन गोंडी धर्माविषयी सविस्तर सांगावे, असे प्रतिपादन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना प्रदेशचे जागोसमा खुशालसिंह सुरपाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजे वीरेंद्रशहा आत्राम, वर्धाचे गोंडी धर्म प्रचारक मारोती उईके, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, अवचितराव सयाम, रंजना उईके, जि.प. समाजकल्याण सभापती माधुरी संतोष उरेते, जि.प सदस्य लालसू नोगोटी, डॉ. पीतांबर कोडापे, पिसाजी कुळमेथे, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, दौलत धुर्वे, शामराव उइके आदी उपस्थित होते. याप्रसंगी समाजासाठी उल्लेखनीय काम करणाºया आदिवासी कर्मचारी तसेच पदाधिकाºयांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान अधून मधून गोंडी नृत्य सादर करण्यात आले. संचालन संतोष सोयाम, प्रास्ताविक ज्योतीराव गावडे तर आभार कालिदास कुसनाके यांनी मानले. जानकीराम कुसनाके, दिवाकर वेलादी, आनंदराव सिडाम, संतोष सोयाम, कालीदास कुसनाके, अरुण मडावी, देवराव कुसनाके, दिनेश कुसनाके, मारोती दब्बा, सुधाकर सिडाम, महादेव सिडाम, मीराजी मडावी, संतोष नैताम, दीपक मडावी, पुरूषोत्तम सोयाम, रूपेश मडावी, कृष्णा गावडे, मोहन मडावी, संतोष दब्बा, गिरमा मडावी, देवाजी सिडाम, रमेश सिडाम, हणमंतू मडावी यांनी सहकार्य केले.