आदिवासींनी मार्कंडा येथे केले गंगापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:24 IST2018-02-11T01:23:45+5:302018-02-11T01:24:22+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यंदा प्रथमच गोंडीयन धर्म पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून शोभायात्रा काढण्यात आली.

Tribal made Gangapujan at Markanda | आदिवासींनी मार्कंडा येथे केले गंगापूजन

आदिवासींनी मार्कंडा येथे केले गंगापूजन

ठळक मुद्देगावातून काढली शोभायात्रा : अनेक वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच झाली पूजा

ऑनलाईन लोकमत
मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यंदा प्रथमच गोंडीयन धर्म पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यात बहुसंख्य आदिवासीबांधव सहभागी झाले होते.
मार्कंडादेव येथे आदिवासी बांधवांच्या वतीने गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर माजी सरपंच ललीता मरस्कोल्हे व सीताराम मरस्कोल्हे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पहिल्यांदाच आदिवासी गोंडीयन धर्म पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. यावेळी भगत म्हणून राष्ट्रीय कोया पूनेम भूमका सेवा संस्था चांदागडचे सचिव संतोष मसराम यांनी काम पाहिले. यावेळी पारंपारिक इलाका ग्रामसभा सगणापूर अंतर्गत ५० गावातील लोकप्रतिनिधी तसेच समाजबांधव उपस्थित होते. सोबतच डॉ. रवींद्र सुरपाम, संतोष सोयाम, तहसीलदार अरूण येरचे, डॉ. साईनाथ कोडापे, हरिदास टेकाम, गोपीनाथ कोवे, अरूणा मडावी, डॉ. किशोर पेंदे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, प्रकाश गावडे, ग्रा. पं. सदस्य अश्विनी परचाके, सुधाकर उईके, सुनीता मरस्कोल्हे, कीर्ती आत्राम, मनोज आत्राम उपस्थित होते.
३० भूमकांच्या साक्षीने पूजा करण्यात आली. तत्पूर्वी आदिवासी रेला नृत्याने गावातून वाजतगाजत वैैनगंगेच्या डोहात दिवा सोडण्यात आला. गोंडराजाने सुरूवात केलेली पूजा अनेक दिवसांपासून बंद होती. पहिल्यांदाच ही पूजा करण्यात आली. यापुढे दरवर्षी ही पूजा होणार आहे.

Web Title: Tribal made Gangapujan at Markanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.