आदिवासी गोटूल भवनाचे लोकार्पण
By Admin | Updated: January 19, 2017 02:04 IST2017-01-19T02:04:09+5:302017-01-19T02:04:09+5:30
आलापल्ली येथील आदिवासी गोटूल भवनाचे लोकार्पण माजी राज्यमंत्री तथा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष

आदिवासी गोटूल भवनाचे लोकार्पण
आलापल्लीत कार्यक्रम : सामाजिक कार्यक्रमांसाठी होणार उपयोग
आलापल्ली : आलापल्ली येथील आदिवासी गोटूल भवनाचे लोकार्पण माजी राज्यमंत्री तथा राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, माजी जि. प. उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सरपंच रेणुका कुळमेथे, सुकरू कोरेत, सेवा निवृत्त शिक्षक कळते आदी उपस्थित होते.
गोटूल भवनामुळे आदिवासी परंपरा व संस्कृती टिकून राहते. व समाजाचा सर्वांगिण विकास होतो, समाज जोपर्यंत संघटीत होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही समाज एक संघटीत होण्यासाठी समाज भवनाची आवश्यकता आहे. गोटूल भवनातून समाज परिवर्तन घडवून आणावे व समाजाचा विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी, विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी व आदिवासी संस्कृती टिकून राहण्यासाठी गोटूल भवन आवश्यक आहे. याचा सदुपयोग विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी करावा व पुढच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन हकीम यांनी केले. याप्रसंगी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम व सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
लोकार्पण समारंभाचे प्रास्ताविक व संचालन कैलास कोरेत यांनी केले. यावेळी अल्ताप पठान, आशिष झाडे, सत्यन्ना मेरगा, पराग पांढरे, वासुदेव पेद्दीवार, सुनंदा मड़ावी, रवि मुप्पीडवार आदी व असंख्य समाजबांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी सहकार्य केले. (वार्ताहर)