जारावंडी, दोलंदा येथे चाचणी प्रशिक्षण
By Admin | Updated: September 7, 2015 01:35 IST2015-09-07T01:35:32+5:302015-09-07T01:35:32+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जारांवडी व दोलंदा येथे अनुक्रमे ५१, ३८ शिक्षकांना पायाभूत चाचणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

जारावंडी, दोलंदा येथे चाचणी प्रशिक्षण
जारावंडी, दोलंदा येथे चाचणी प्रशिक्षण
धानोरा : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जारांवडी व दोलंदा येथे अनुक्रमे ५१, ३८ शिक्षकांना पायाभूत चाचणीचे प्रशिक्षण देण्यात आले.
जारावंडी येथे प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच सुधाकर टेकाम यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिचामी, मुख्याध्यापक थुलकर, हेमके, मडावी, दिंडवी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भाषा व गणित विषयाची पायाभूत चाचणी, लेखी व तोंडी प्रात्यक्षिक पायाभूत चाचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आनंददायी शिक्षण याबाबत केंद्रप्रमुख बी. यू. खोब्रागडे तसेच विकास चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
दोलंदा येथे कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बी. यू. खोब्रागडे व मुख्याध्यापक उपस्थित होते. पायाभूत चाचणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अप्रगत, साधारण, प्रगत स्तरातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पारटवार यांनी प्रार्थना, प्रेरणागीत, देशभक्तीगीत सादर केले. मुख्याध्यापक कावळे व शिक्षकांनी प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.