वाघांच्या दहशतीने पहाटे फिरायला जाणाऱ्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:21+5:30

हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वाघांनी फिरणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून ठेवली आहे.

The trepidation of the tigers in the dawn | वाघांच्या दहशतीने पहाटे फिरायला जाणाऱ्यांचा हिरमोड

वाघांच्या दहशतीने पहाटे फिरायला जाणाऱ्यांचा हिरमोड

ठळक मुद्देबंदोबस्त करा । चारही मार्गांवरील गर्दी ओसरली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : थंडीची चाहूल लागताच पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्ग, आरमोरी मार्ग, धानोरा मार्ग हे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची आवडती ठिकाणे आहेत. मात्र पावसाळ्यापासून वाघांची दहशत असल्याने फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमालीची घटली आहे.
हिवाळा हा आरोग्यासाठी शक्तीवर्धक ऋतू मानला जातो. पहाटेच्या गुलाबी थंडीत शारीरिक कसरत करण्याचे अनेक फायदे असल्याने सूर्य उगवण्यापूर्वी धानोरा, चामोर्शी, आरमोरी मार्गावर नागरिकांची रांग लागते. काही नागरिक तर पहाटेलाच घराबाहेर पडत होते. मात्र यावर्षी वाघांनी फिरणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये दहशत निर्माण करून ठेवली आहे. गडचिरोली शहराच्या जवळ असलेल्या कोटगूल, पुलखल, मुडझा, वाकडी परिसरात वाघाचे अधूनमधून दर्शन होत आहे. गडचिरोली शहराला जंगल लागून आहे. विशेष करून पोटेगाव व चामोर्शी मार्गालगत झुडपी जंगल आहे. वाघ असल्याने नागरिकांनी शक्यतो रात्री किंवा एकटे जाऊ नये, असे आवाहन वनविभागामार्फत केले आहे. काही नागरिक पहाटेला फिरायला जातात. मात्र त्यांच्या मनात वाघाची भिती कायम आहे. त्यामुळे मनमोकळेपणाने फिरण्याच्या आनंदावर विरजन पडले आहे. आजपर्यंत गडचिरोली शहरातील एकाही व्यक्तीवर सुदैवाने वाघाने हल्ला केला नाही. मात्र वाघाची भिती नागरिकांच्या मनात कायमची कोरली आहे. अनेकांनी तर वाघाच्या भितीने फिरायला जाणेच सोडून दिले आहे.
वाघाच्या भितीने जंगल वाचले
हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गडचिरोलीतील नागरिक सरपन खरेदी करतात. त्यामुळे काही मजूर जंगलात जाऊन सरपण आणत होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत होती. मात्र वाघाच्या भितीने सरपण आणणे बंद झाल्याने जंगलतोडही थांबली आहे.

Web Title: The trepidation of the tigers in the dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ