धावत्या कारवर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:26 IST2019-05-21T22:26:41+5:302019-05-21T22:26:57+5:30
कुरखेडा-देसाईगंज मार्गावर गेवर्धा नजीकच्या पुलाजवळ एका धावत्या कारवर झाड कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धावत्या कारवर झाड कोसळले
ठळक मुद्देगेवर्धाजवळील घटना : सुदैवाने जीवित हानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा-देसाईगंज मार्गावर गेवर्धा नजीकच्या पुलाजवळ एका धावत्या कारवर झाड कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
टिकाराम नाकाडे हे एमएच ३३ व्ही ०१८७ क्रमांकाच्या कारने देसाईगंजवरून कुरखेडाकडे जात होते. दरम्यान जोराचे वादळ सुरू झाले. गेवर्धा नाल्यावरील पुलाजवळ रस्त्याच्या बाजुला असलेले झाड कारवर कोसळले. सुदैवाने सदर झाड कारच्या समोरच्या भागावर कोसळले. त्यामुळे नाकाडे हे जखमी झाले नाही. झाड कोसळल्यानंतर या मार्गावरील वाहतूक मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ठप्प पडली होती.