२८३ जणांची चिकित्सा

By Admin | Updated: January 22, 2017 01:43 IST2017-01-22T01:43:35+5:302017-01-22T01:43:35+5:30

तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रूग्णालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एटापल्ली

Treatment of 283 people | २८३ जणांची चिकित्सा

२८३ जणांची चिकित्सा

एटापल्ली तालुक्यात शिबिर : गरोदर, स्तनदा माता व बालकांचा समावेश
एटापल्ली : तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रूग्णालय एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एटापल्ली तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत मानव विकास मिशन अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात गरोदर, स्तनदा माता व बालक अशा एकूण २८३ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरात ० ते ५ वयोगटातील बालके सॅम-मॅम (अतिकुपोषित बालके) यांची तपासणी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आला. दरम्यान ९६ गरोदर माता, ६४ स्तनदा माता, अतिजोखीमीच्या २४ माता व १०७ बालके असे एकूण २८३ जणांची एटापल्ली अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा, गट्टा, कसनसूर येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर तपासणी बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलींद सूर्यवंशी, गडचिरोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवन राऊत, एम. एम. यू. डॉ. अर्चना भंडारी, ग्रामीण रूग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. भावेश वानखेडे, जिल्हा स्तरावरील पर्यवेक्षक पायाळ यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत एकूण ५९ गरोदर माता, ५५ स्तनदा माता, अतिजोखीमीच्या १८ माता, ० ते ६ महिन्याच्या ५५, ६ महिने ते ५ वर्षापर्यंतचे १४, अतिजोखीमीची बालके ९, प्राथमिक आरोग्य गट्टा अंतर्गत गरोदर माता १८, स्तनदा माता ९, अतिजोखीमीच्या माता ४, ० ते ६ महिन्यातील ९, ६ महिने ते ५ वर्षातील ८, अतिजोखीमीचे बालके ५, प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर अंतर्गत एकूण गरोदर माता १९, स्तनदा माता निरंक, अतिजोखीमीच्या २ माता, ६ महिने ते ५ वर्ष व अतिजोखीमीचे निरंक बालके असे एकूण २८३ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. तिन्ही पीएचसीतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Treatment of 283 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.