रेती आणणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून एक जागीच ठार
By Admin | Updated: May 4, 2015 01:33 IST2015-05-04T01:33:57+5:302015-05-04T01:33:57+5:30
तालुक्यातील मद्दीकुंठा येथील नदीघाटावरून रेती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली उलटून एक जागीच ठार...

रेती आणणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून एक जागीच ठार
सिरोंचा : तालुक्यातील मद्दीकुंठा येथील नदीघाटावरून रेती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टरची ट्राली उलटून एक जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना मद्दीकुंठा-रामंजापूर दरम्यान रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
साईकिरण स्वामी पागे (१५) रा. आदिमुक्तापूर ता. सिरोंचा असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर बापू नारायण पागे (२०), राकेश पोचम पागे (२१) व श्रीकांत गजानन दुर्गम (३०) सर्व रा. आदिमुक्तापूर हे तिघेजण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार एमएच ३३ एफ ३५१३ क्रमांकाची ट्रॅक्टर घेऊन चालक रवी चिनतमय्या पागे (२२) रा. आदिमुक्तापूर हा मजुरांना घेऊन मद्दीकुंठा नदी घाटावरून रेती भरून ट्रॅक्टर आणत होता. दरम्यान मद्दीकुंठा-रामंजापूरच्या मध्यंतरी भागात समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता मोकळा करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालक रवी पागे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व एमएच ३३ जी ००६ क्रमांकाची ट्राली रस्त्याच्या कडेला उलटली. यात साई किरण पागे हा जागीच ठार झाला तर बापू पागे, राकेश पागे व श्रीकांत दुर्गम हे तिघे जण जखमी झाले. जखमींना तत्काळ सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टरचालकाला अटक केली आहे. ट्रॅक्टरचालक रवी पागे याच्यावर पोलिसांनी भादंविचे कलम २८९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)