२३ पासून वैरागड येथे यात्रा महोत्सव

By Admin | Updated: February 22, 2017 02:04 IST2017-02-22T02:04:15+5:302017-02-22T02:04:15+5:30

श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान वैरागड येथे महाशिवरात्रीनिमित्त २३, २४, २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Travel Festival from 23 to Vairagarh | २३ पासून वैरागड येथे यात्रा महोत्सव

२३ पासून वैरागड येथे यात्रा महोत्सव

वैरागड : श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान वैरागड येथे महाशिवरात्रीनिमित्त २३, २४, २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती तथा ग्रामपंचायत वैरागड यांच्या वतीने या यात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ फेब्रुवारी रोजी गुरूवारला सकाळी ६.३० वाजता घटस्थापना होणार आहे. रात्री ९ वाजता नियोजित भजन मंडळाचे भजन होणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता महापूजा व अभिषेक मान्यवरांच्या हस्ते होईल. दुपारी १२ वाजता भक्तिपर प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते राहतील. उद्घाटन आमदार क्रिष्णा गजबे, प्रंचित पोरेड्डीवार, भाग्यवानजी खोब्रागडे यांच्या उपस्थितीत होईल.
यावेळी आनंदराव गेडाम, रामकृष्ण मडावी, हरीराम वरखडे, प्रकाश पोरेड्डीवार, परशुराम कुत्तरमारे, जीवन नाट, अतुल गण्यारपवार, विश्वास भोवते, बशिर पटेल कुरेशी, पूनम गुरनुले, हैदर पंजवानी, रमेश मेहता, कवडू आखाडे, किशोर सहारे, नंदू पेट्टेवार, डी. के. मेश्राम, सरपंच गौरी सोमनानी आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता उपवासाचा नाश्ता, रात्री ९ वाजता प्रहार पूजा, भजन व जागरण कार्यक्रम होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पूजा, सकाळी १० वाजता हवन, दुपारी १ वाजता गोपालकाला, दुपारी ३ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता अरिवंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते टिपूर जळण्याचा कार्यक्रम होणार आहे.
 

Web Title: Travel Festival from 23 to Vairagarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.