शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात लोहखनिजाची वाहतूक

By admin | Updated: March 3, 2017 01:04 IST

नक्षलवाद्यांनी सुरजागड पहाडीवर वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा परत लोहखनिज उत्खनन वाहतूक कामाला सुरूवात झाली आहे.

परप्रांतीय गाड्या वाढल्या : शासनाच्या भूमिकेची नागरिकांना प्रतीक्षाएटापल्ली : नक्षलवाद्यांनी सुरजागड पहाडीवर वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा परत लोहखनिज उत्खनन वाहतूक कामाला सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारकडून या जाळपोळीच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली होती व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लोहदगड वाहतुकीचे काम बंद पडणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता २८ फेब्रुवारीपासून पुन्हा कामाला सुरूवात झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून केंद्रीय राखीव सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील ट्रक लोहखनिज वाहतुकीसाठी लावण्यात आले आहेत. सुरजागड प्रकल्प तालुक्यातच उभारा व प्रकल्प नकोच, असे दोन मतप्रवाह तालुक्यातील नागरिकांमध्ये आहेत. यासाठी अनेक आंदोलनही झालीत. परंतु त्यानंतरही लोहखनिजाची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात पहिले प्रकल्प उभारा व विकास कामे सुरू करा, बेरोजगारांना काम द्या, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्य सरकारने या तालुक्यातून लोहखनिजाची वाहतूक सुरू केली असली तरी हा प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे, याविषयी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. प्रकल्प तालुक्यातच व्हावा, अशी मागणी असून याकडे शासन कशा पध्दतीने पाहते, याकडे आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)