जिल्ह्यातून तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण

By Admin | Updated: April 22, 2017 01:32 IST2017-04-22T01:32:13+5:302017-04-22T01:32:13+5:30

पोलीस महासंचालक कार्यालयाने गडचिरोली जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण केले आहे.

Transfer of three police inspectors from the district | जिल्ह्यातून तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण

जिल्ह्यातून तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण

एक येणार : तिघांचे विनंती अर्ज रद्द
गडचिरोली : पोलीस महासंचालक कार्यालयाने गडचिरोली जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण केले आहे. तर एका पोलीस निरिक्षकाला जिल्ह्यात बदली देण्यात आली आहे. तीन पोलीस निरिक्षकांनी महासंचालकांकडे विनंती बदलीसाठी प्रस्ताव दिला होता. तो रद्द करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये देसाईगंजचे ठाणेदार रवींद्र वामनराव पाटील, चामोर्शीचे ठाणेदार किरण अवचर, अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांचा समावेश आहे. रवींद्र पाटील यांना नवी मुंबई, किरण अवचर यांना सोलापूर व संजय मोरे यांना कोल्हापूर येथे बदली देण्यात आली आहे. तर नवी मुंबई येथून दामोधर चौधरी यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. बदलीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक, प्रकाश जाधव तर आरमोरीचे ठाणेदार महेश पाटील यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transfer of three police inspectors from the district