हमीपत्रावर वेतन देयके पारीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST2021-05-28T04:26:50+5:302021-05-28T04:26:50+5:30

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन प्रक्रियेत अनुदान मंजूर झाले असताना शाईची प्रत, शिवाय कोषागार कार्यालय एप्रिल महिन्याचे ...

Transfer salary payments on guarantee | हमीपत्रावर वेतन देयके पारीत करा

हमीपत्रावर वेतन देयके पारीत करा

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन प्रक्रियेत अनुदान मंजूर झाले असताना शाईची प्रत, शिवाय कोषागार कार्यालय एप्रिल महिन्याचे देयक मंजूर करत नसल्यामुळे नागपूर विभागातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कम॔चाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कम॔चाऱ्यांचे ऑनलाईन वेतन प्रक्रियेत वेतन अधीक्षकांकडून बी. डी. एस. काढून तसेच अधीक्षकांकडून हमीपत्र देऊनही शाईची प्रत प्राप्त झाल्याशिवाय देयक मंजूर होणार नसल्याची माहिती संघटनेला प्राप्त झाली आहे. शाईच्या प्रतीचा आग्रह धरणे चुकीचे असून, त्यामुळे नागपूर विभागातील सर्व जिल्हा कोषागार यांना माहे एप्रिलची देयके मंजूर करण्यासंदर्भात निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. वेतन पथक अधीक्षक यांनी दिलेल्या हमीपत्रावर वेतन देयक पारित करण्याच्या सुधारित सूचना द्याव्यात, अन्यथा खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर विभागात सर्व तालुकास्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनावर खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर, कार्याध्यक्ष रहमतुल्लाह खान, सचिव विजय नंदनवार, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ, विभागीय कार्याध्यक्ष संजय बोरगावकर, विभागीय सचिव मोहन सोमकुवर यांच्या सह्या आहेत.

Web Title: Transfer salary payments on guarantee