पोषण आहार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By Admin | Updated: April 12, 2015 02:16 IST2015-04-12T02:16:12+5:302015-04-12T02:16:12+5:30
देऊळभट्टी केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांतील पोषण आहार शिजविणाऱ्या महिला व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगूल येथे शुक्रवारी घेण्यात आले.

पोषण आहार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कोरची : देऊळभट्टी केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांतील पोषण आहार शिजविणाऱ्या महिला व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगूल येथे शुक्रवारी घेण्यात आले.
प्रशिक्षणाला अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख नारदेलवार, नंदनवार, दांडवे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षणार्थ्यांना पोषण आहार शिजविण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आहार शिजविताना बाळगावयाची स्वच्छता, आहाराचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक टी. एम. वालदे यांनी पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच आत्राम यांनी पोषण आहार शिजविताना बाळगावयाची स्वच्छता तसेच आहाराचे नियम व इतर बाबींविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार गायकवाड यांनी मानले. केंद्रातील मुख्याध्यापक व पोषण आहार शिजविणाऱ्या महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)