ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दारू व तंबाखूमुक्त गावासाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:38+5:302021-04-01T04:36:38+5:30

ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. ...

Training for Gram Panchayat office bearers for alcohol and tobacco free village | ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दारू व तंबाखूमुक्त गावासाठी प्रशिक्षण

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दारू व तंबाखूमुक्त गावासाठी प्रशिक्षण

ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती करणे. कोरोना काळात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गावातून तंबाखू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री सुरु असल्यास त्यांना नोटीसच्या माध्यमातून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करणे. दारूबंदी असून, तंबाखूविक्री सुरु असल्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करणे. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद झाल्यास गावाचा विकास होणार आहे. याबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत ग्रामपंचायत अमिर्झा, मुरमाडी, मौशिखांब, मरेगाव, टेंभा, भिकारमौशी व गिलगाव या सात ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Training for Gram Panchayat office bearers for alcohol and tobacco free village