शेतकरी हक्क कायद्यावर प्रशिक्षण
By Admin | Updated: January 24, 2015 22:53 IST2015-01-24T22:53:45+5:302015-01-24T22:53:45+5:30
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील कृषी महाविद्यालयात आयोजित ‘पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१’ यावर आधारित प्रशिक्षण वर्गात १०० हून अधिक

शेतकरी हक्क कायद्यावर प्रशिक्षण
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने शनिवारी येथील कृषी महाविद्यालयात आयोजित ‘पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २००१’ यावर आधारित प्रशिक्षण वर्गात १०० हून अधिक शेतकऱ्यांनी पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्याविषयी माहिती जाणून घेतली.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विनोद गुळदेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. संतोष गहुकर, जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहायक प्रा. डॉ. आम्रपाली आखरे, कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. आर. कामडी, प्रशिक्षण समन्वयक डॉ. एस. एल. बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे, जि.प. चे कृषी विकास अधिकारी जी. आर. कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पी. जी. इंगोले म्हणाले, जैव विविधतेची नोंद ग्रामपातळीवर तसेच तालुका पातळीवर होणे आवश्यक आहे. नोंद केल्यामुळे गावकऱ्यांना ह्या जैव विविधतेवर आपला हक्क सांगता येईल. तसेच कायदेशीर अधिकारासह आर्थिक फायदाही होऊ शकतो. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जैव विविधतेची योग्य प्रकारे जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. विनोद गुळदेकर म्हणाले, देशी पीक वाणांची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक बियाणे जतन करणे व आवश्यकता भासल्यास पुनरूत्पादन करणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी शेतीसह शेती कायद्याचा अभ्यास करावा, जेणे करून शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या हक्काची जाणीव निर्माण होईल. शेतकरी आत्महत्या थांबविण्याकरिता कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी जनजागृती करतील, असे गुळदेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. पी. लांबे, संचालन डॉ. सुधीर एल. बोरकर यांनी केले. आभार एस. एस. कराडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. या प्रशिक्षणाला गडचिरोली तालुक्यातील व परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. (स्थानिक प्रतिनिधी)