शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने बॅरिकेट तोडले, पण...

By संजय तिपाले | Updated: March 30, 2023 18:20 IST

तस्कर शंकर अण्णाला पोलिसांचा दणका: अंधारात सव्वाशे किलोमीटर रंगला पाठशिवणीचा खेळ

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत शेजारील चंद्रपूरहून चोरीछुपे दारूची तस्करी करणाऱ्या शंकर अण्णा रॉय याच्या जीपने पोलिसांचे बॅरिकेट तोडून धूम ठोकली. अंधाऱ्या रात्री पुढे दारूची जीप तर मागे पोलिस असा पाठशिवणीचा खेळ तब्बल सव्वाशे किलोमीटरपर्यंत रंगला. अखेर पोलिसांनी जीप पकडलीच. यावेळी चालकाने पोबारा केला तर त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या.

स्थानिक गुन्हे शाखेने २९ मार्चला रात्री सोनापूर (ता. चामोर्शी) येथे ही कारवाई केली. शंकर अण्णा रॉय, चालक राकेश मशीद व अमित बारई यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा व दारू तस्करीच्या कलमान्वये चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. शंकर आण्णा या तस्कराने चंद्रपूरहून मालवाहू जीपमधून दारू मागविल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी हरणघाट मार्गावर २९ रोजी रात्री सापळा लावला. शंकर आण्णाची दारूची जीप वेगात आली व पोलिसांच्या इशाऱ्याला न जुमानता बॅरिकेटला धडक देऊन सुसाट गेली. गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सव्वाशे किलोमीटर पाठलाग करून जीप पकडली.

सोनापूरमध्ये जीप उभी करून चालकाने ठोकली धूम

चालक राकेश मशीद (रा. गौरीपूर, ता. चामोर्शी) याने चामोर्शी व आष्टी येथील विविध गावांत जीप फिरवून पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीही त्याचा पिच्छा सोडला नाही. अखेर सव्वाशे किलाेमीटर पाठलाग करून जीप चामोर्शी हद्दीतील सोनापूर येथे पकडली. यावेळी जीप उभी करून चालक राकेश मशीद याने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली तर त्याचा साथीदार अमित बारई हा पोलिसांच्या हाती लागला. १४ लाखांची देशी-विदेशी दारू व मालवाहू जीप असा एकूण १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शंकर अण्णा रॉयसह चालक राकेश मशीद यांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदीGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस