कांदळी मार्गावर यावर्षीही पावसाळ्यात अडणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST2021-05-24T04:35:56+5:302021-05-24T04:35:56+5:30

जारावंडी-कसनसूर रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी ...

Traffic will be blocked on Kandali road this year as well | कांदळी मार्गावर यावर्षीही पावसाळ्यात अडणार वाहतूक

कांदळी मार्गावर यावर्षीही पावसाळ्यात अडणार वाहतूक

जारावंडी-कसनसूर रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केले होते. अजूनही या कामाला सुरुवात झाली नाही.

कांदळी हे गाव जारावंडीपासून दोन किमी अंतरावर एटापल्ली मार्गावर आहे. छत्तीसगड राज्यातून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बँकेत व तालुक्याला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. नवीन पुलाच्या कामाकरिता जुन्या पुलाच्या बाजूला खोदकाम करण्यात आले हाेते. पावसाळ्यात पुलाजवळची माती वाहून गेल्याने पुलाजवळ मोठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटी बसेस काही दिवस बंद झाली हाेती. नवीन पुलाचे काम अपूर्ण असल्याने यावर्षीही जुन्याचा पुलावरून वाहतूक करावी लागणार आहे.

Web Title: Traffic will be blocked on Kandali road this year as well