जड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:33+5:302021-03-15T04:32:33+5:30
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टी येथील डाॅ. आंबेडकर चाैकात माेजकी जागा असल्याने अवजड व ...

जड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी
आष्टी : गडचिराेली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टी येथील डाॅ. आंबेडकर चाैकात माेजकी जागा असल्याने अवजड व लांब वाहने फिरण्यास अडचणी येत आहेत. दुचाकी व पादचारी वाहनधारकांना अवजड वाहनांपासून धाेका असताे. अनेकदा वाहनांमुळे काेंडी निर्माण हाेते. त्यामुळे चाैकातील रुंदीकरण करावे, अशी मागणी केली आहे.
गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात अवजड वाहनांमुळे वाहतुकीची काेंडी हाेते. वाहन वळताना मागे येणाऱ्या वाहनधारकांना धाेका हाेण्याची शक्यता असते. अपघाताचा धोका ओळखून या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्गाने दिवसभर ट्रेलर व जड वाहनांची वर्दळ असते. तसेच मुख्य चौक असल्याने या ठिकाणी बरीच गर्दी असते. बऱ्याचदा पुतळ्याच्या संरक्षक भिंतीला वाहनांनी धडक दिलेली आहे.