कोरची-चिचगड राष्ट्रीय महामार्गावर झाड काेसळल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:58+5:302021-09-16T04:45:58+5:30
काेरची-चिचगड मार्गावर बाेदालदंड गावाजवळ रस्त्याच्या कडेला खूप माेठे झाड हाेते. सदर झाडाला स्थानिक भाषेत धावडा या नावाने ओळखतात. बुधवारी ...

कोरची-चिचगड राष्ट्रीय महामार्गावर झाड काेसळल्याने वाहतूक ठप्प
काेरची-चिचगड मार्गावर बाेदालदंड गावाजवळ रस्त्याच्या कडेला खूप माेठे झाड हाेते. सदर झाडाला स्थानिक भाषेत धावडा या नावाने ओळखतात. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने झाड रस्त्यावर काेसळले. एरवी हा मार्ग वर्दळीचा असताे. गडचिरोली व गाेंदिया जिल्ह्यातून या मार्गाने रहदारी माेठ्या प्रमाणात सुरू असते. परंतु यावेळी फारशी रहदारी नव्हती. झाड कोसळले तेव्हा एक चारचाकी वाहन किंचित पुढे निघाल्याने मोठी जीवितहानी टळली. झाड काेसळल्यानंतर सदर मार्गावर ट्रक व चारचाकी वाहनांची रांग लागली. अनेक दुचाकीस्वार रोडच्या बाहेरील जंगलातून मार्ग काढून निघून गेले. माेठी वाहने जवळपास दोन तास अडकून पडली. त्यामुळे बराच त्रास वाहनधारकांना सहन करावा लागला.
बाॅक्स
स्थानिकांची मदत; प्रशासन उदासीन
बोदालदंड येथील नागरिकांच्या मदतीने वाहन चालकांकडून मार्ग मोकळे करण्याचे काम सुरू करण्यात आले. संबंधित विभागाने मार्ग मोकळे करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक हाेते; परंतु या ठिकाणी कुठल्याही विभागातील कर्मचारी आले नाहीत. ज्या वाहनचालकांना घाई होती त्या वाहनचालकांनी स्थानिकांच्या साहाय्याने झाड कापून बाजूला केले; परंतु तेही अर्धवट सरकवल्याने अर्धे झाड अजूनही रस्त्यावरच पडून आहे. त्यामुळे येथे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.