बांबू नेणारा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:53 IST2018-03-12T23:53:11+5:302018-03-12T23:53:11+5:30
आरमोरीकडे जाणारा बांबूने भरलेला ट्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने उलटला.

बांबू नेणारा ट्रक उलटल्याने वाहतूक विस्कळीत
आॅनलाईन लोकमत
देसार्ईगंज : आरमोरीकडे जाणारा बांबूने भरलेला ट्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरील वळणावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने उलटला. सदर घटना सोमवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारस घडली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
देसाईगंज-आरमोरी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ वळण रस्ता आहे. या वळण रस्त्यावर रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास एमएच-३४-एबी-३८८६ क्रमांकाचा ट्रक बांबू घेऊन आरमोरीकडे जात होता. दरम्यान वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक रोडलगत असलेल्या भंगारच्या दुकानावर उलटला. मात्र यावेळी भंगारच्या दुकानात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. सदर ट्रक बल्लारपूर येथील निर्भया ट्रॉन्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली. त्याला देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात आली.