अहेरीत पारंपरिक दसरा उत्सवाला उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:29 IST2017-09-30T00:29:16+5:302017-09-30T00:29:26+5:30
अहेरीतील दसरा उत्सव पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पालखीतून स्वार होऊन आलापल्ली मार्गावरील मामा तलावावर जाऊन पूजन केले.

अहेरीत पारंपरिक दसरा उत्सवाला उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीतील दसरा उत्सव पाहण्यासाठी शुक्रवारी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी पालखीतून स्वार होऊन आलापल्ली मार्गावरील मामा तलावावर जाऊन पूजन केले.
अहेरी येथील राज परिवारातर्फे मागील दीडशे वर्षांपासून दसरा उत्सवाचा परंपरा जोपासली जात आहे. दसरा उत्सव साजरा करणारी ही सहावी पिढी आहे. नवव्या दिवशी पालखी काढण्यात आली. तलावावर जाऊन पारंपरिक पद्धतीने निशाना लावून कोंबडीची शिकार करण्यात आली. दहाव्या दिवशी (शनिवारी) सकाळी १० वाजता साईबाबांची पालखी काढली जाणार आहे. या महोत्सवाला छत्तीसगड, तेलंगणातील राज्यातीलही भाविक उपस्थित राहतात. अहेरी दसरा महोत्सवासाठी राज्य शासनाने पाच लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.