शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवाजी हायस्कूलची निकालाची परंपरा कायम

By admin | Updated: June 14, 2017 01:54 IST

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे

९३.१२ टक्के निकाल : ७२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण; १३ विद्यार्थी ९० टक्क्यांवर पोहोचले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. सदर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ९३.१२ टक्के लागला आहे. शिवाजी हायस्कूलचे तब्बल १३ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले असून ७२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूलमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेला एकूण ३४९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. यापैकी ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी मयूर नीलकंठ भांडेकर याने ९५.६० टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे. प्राजक्ता नंदकिशोर भांडेकर या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. रोहित हुमेश लांजेवार याने ९४ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. वैभव गजानन नैताम याने ९२.८० टक्के, मधुरा श्यामराव कुंभार ९२ टक्के, दीप्ती कृष्णा उसेंडी ९२ टक्के, प्रथमेश प्रशांत साळवे ९२ टक्के, दीप्ती देविकांत शिवणकर ९१.८० टक्के, रजनी जीवन दडमल ९१.८० टक्के, साहिल प्रकाश मोहितकर ९१.४० टक्के, त्रिशूल अनंत साळवे ९१.२० टक्के, शिवम दिलीप कुकुडकर ९१.२० टक्के, रूद्राणी अविनाश महाजन ९०.८० व वैष्णवी विजय नवघरे हिने ८९.६० टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे. शिवाजी हायस्कूलने गेल्या ७- ८ वर्षांपासून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकारी व सदस्यांचे गुणवत्तेबाबत नियोजन, प्राचार्य व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शिस्तप्रियता, अतिरिक्त वर्ग आदींसह इतर बाबींमुळे शिवाजी हायस्कूलची गुणवत्तेत भरारी कायम आहे. मार्च २०१७ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, उपाध्यक्ष के. के. भोयर, सचिव देवराव म्हशाखेत्री, सहसचिव डी. एन. चापले, सदस्य एल. एस. राऊत, अनिल मुनघाटे, एन. आर. म्हशाखेत्री, एस. सी. मुनघाटे, के. वाय. वाघरे, जी. व्ही. बानबले यांच्यासह प्राचार्य जी. एम. दिवटे, उपमुख्याध्यापक जी. टी. मामीडवार, पर्यवेक्षक डी. के. उरकुडे तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर उपक्रमातही शिवाजी हायस्कूल दरवर्षी अग्रेसर राहते. इयत्ता बारावीच्या निकालातही शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने यंदा भरारी घेतली आहे. या शाळेचे अनेक गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी आदीसह विविध क्षेत्रात यश मिळविले आहेत. सतत सराव, शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन या भरवशावर यशस्वी झाल्याचे शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी मयूर नीलकंठ भांडेकर याने ९५.६० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून द्वितीय तर शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्राजक्ता भांडेकर, रोहित लांजेवार यांच्यासह ९० टक्के गुण मिळविलेल्या १४ विद्यार्थ्यांचा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव डी. एन. चापले, सदस्य जी. व्ही. बानबले, प्राचार्य जी. एम. दिवटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शाळेत गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. शेषराव येलेकर, रवींद्र म्हशाखेत्री, घोटेकर आदी शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पेढा भरवून त्यांचे कौतुक केले.