ट्रॅक्टरने ताेडली नाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:33 IST2021-01-22T04:33:16+5:302021-01-22T04:33:16+5:30

सिराेंचा : सुस्थितीत असलेल्या नालीवरून ट्रॅक्टर नेऊन नालीची ताेडफाेड करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर कारवाई करावी, अशी मागणी सिराेंचा प्रभाग क्र.२ ...

The tractor drained the drain | ट्रॅक्टरने ताेडली नाली

ट्रॅक्टरने ताेडली नाली

सिराेंचा : सुस्थितीत असलेल्या नालीवरून ट्रॅक्टर नेऊन नालीची ताेडफाेड करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर कारवाई करावी, अशी मागणी सिराेंचा प्रभाग क्र.२ येथील निवासी प्रकाश बुरम यांनी केली आहे. प्रभाग क्र.२ मध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नगर पंचायतने नालीचे बांधकाम केले आहे. नालीच्या पलीकडे असलेल्या एका जुन्या घराची माती ट्रॅक्टरद्वारे नेण्यात आली. नालीवरून ट्रॅक्टर नेताना नालीवर काहीच ठेवण्यात आले नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या वजनाने नाली तुटून पडली आहे. नाली बुजल्याने या ठिकाणी सांडपाणी साचून राहणार आहे. याबाबत ट्रॅक्टरधारकाला नागरिकाने विचारले असता, नगर पंचायत नवीन नाली बांधून देईल, तसेच साफसुद्धा करून देईल, असे सांगितले. यावरून ट्रॅक्टरमालकाची मग्रुरी लक्षात येते. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रॅक्टरमालकाविराेधात पाेलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश बुरम यांनी केली आहे.

Web Title: The tractor drained the drain