फिरत्या लोक न्यायालयाचे उद्घाटन
By Admin | Updated: March 14, 2015 00:17 IST2015-03-14T00:17:30+5:302015-03-14T00:17:30+5:30
स्थानिक ग्राम पंचायतमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

फिरत्या लोक न्यायालयाचे उद्घाटन
धानोरा : स्थानिक ग्राम पंचायतमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अॅड. टी. के. गुुंडावार, सुनीता झंझाळ, ग्रामसेवक पिठाले उपस्थित होते. नागरिकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, अधिकार याबाबत टी. के. गुंडावार यांनी मार्गदर्शन केले. राज्य घटनेने नागरिकांना अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे आपले अधिकारी व कर्तव्य यांची जाणीव ठेवून नागरिकांनी आपले आचरण ठेवावे, असे आवाहन आर. बी. म्हशाखेत्री यांनी केले.
फिरत्या लोकन्यायालयाच्या माध्यमातून नागरिकांची विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी फिरत्या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही. व्ही. वाळके यांनी मानले. मार्गदर्शन शिबिराच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)