लोकअदालतीत १ हजार ६७ प्रकरणे निकाली

By Admin | Updated: November 13, 2016 02:19 IST2016-11-13T02:19:07+5:302016-11-13T02:19:07+5:30

महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार

A total of 1,706 cases were filed in the public | लोकअदालतीत १ हजार ६७ प्रकरणे निकाली

लोकअदालतीत १ हजार ६७ प्रकरणे निकाली

जिल्ह्यातील न्यायालयात निपटारा : दूरसंचार, वन विभाग, बँक, वीज विभागातील प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे
गडचिरोली/देसाईगंज/धानोरा : महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरण तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यालयांमध्ये प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १ हजार ६७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यापैैकी देसाईगंज व धानोरा येथे शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत अनुक्रमे ५८ व १७ प्रकरणांमध्ये तडजोड करून ती निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय महा लोकन्यायालयात १० लाख ६ हजार १६ चे एकूण ८३८ प्रलंबित प्रकरणे तसेच ३३ लाख १० हजार ९८३ रूपयांचे एकूण २२९ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे ४३ लाख १६ हजार ९९९ रूपयांची एकूण १ हजार ६७ प्रकरणे राष्ट्रीय लोक न्यायालयात निकाली काढण्यात आली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या नियंत्रणाखाली दिवाणी न्या. वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव ता. के. जगदाळे यांच्या देखरेखेखाली लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश - २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सु. तु. सूर यांनी पॅनल क्रमांक १ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश ता. के. जगदाळे यांनी पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणून तर गडचिरोलीचे मुख्य न्याय दंडाधिकारी आर. बी. रेहपाडे, न्या. सु. म. बोमीडवार यांनी पॅनल ३ व ४ चे काम पाहिले.
देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला दिवाणी न्या. के. आर. सिंघेल, अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. मंगेश शेंडे, अ‍ॅड. लाँगमार्च खोब्रागडे, अ‍ॅड. अतुल उईके, अ‍ॅड. प्रमोद बुद्धे, अ‍ॅड. नामदेव वार्जुरकर, अ‍ॅड. बांबोळकर, अ‍ॅड. पिल्लारे, सहायक अधीक्षक धाबेकर, लघुलेखक मून, देवईकर, आवळे, रोकडे, मोहुर्ले, ठेंगरी, गणेश रामटेके, कोलते, नरेंद्र चांदेवार, परिहार, बोबडे, मेश्राम, तुर्की, यादव उपस्थित होते. न्या. सिंघेल यांच्या मध्यस्थीने बीएसएनएलचे १८१ पैैकी ८, वन विभागाचे ४७ पैैकी १२, बँकांचे २१८ पैैकी ११, वीज वितरण विभागाचे ११० पैकी १७ तसेच दिवाणी १० असे एकूण ५८ प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्यात आले.
धानोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित लोक अदालतीत एकूण १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक अदालतीत बीएसएनएलची एकूण तीन प्रकरणे तसेच स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा चातगाव येथील १४ प्रकरणांचा यात समावेश आहे. यावेळी पॅनल प्रमुख दिवाणी न्या. (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्या. दंडाधिकारी ली. दा. कोरडे, अधिवक्ता टी. के. गुंडावार, सामाजिक कार्यकर्त्या सू. ज. झंझाळ हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: A total of 1,706 cases were filed in the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.