शौचालय, मूत्रिघरांची अवस्था बकाल
By Admin | Updated: July 28, 2015 02:34 IST2015-07-28T02:34:11+5:302015-07-28T02:34:11+5:30
लाखो रूपये खर्च करून ग्रामपंचायत, नगर पंचायत व नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक शौचालय व

शौचालय, मूत्रिघरांची अवस्था बकाल
सर्वत्र अस्वच्छता : महिलांची कुचंबणा; एकाही ठिकाणी पाण्याची सुविधा नाही
गडचिरोली : लाखो रूपये खर्च करून ग्रामपंचायत, नगर पंचायत व नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक शौचालय व मूत्रिघर उभारण्यात आले. मात्र एकाही शौचालय तसेच मूत्रिघरात पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी सारेच शौचालय व मूत्रिघर सद्य:स्थितीत घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. बकाल अवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी लोकमत चमूने गडचिरोली, एटापल्ली, कुरखेडा, चामोर्शी, देसाईगंज, अहेरी, आरमोरी आदी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालय व मूत्रिघरांची पाहणी करून वस्तूस्थिती जाणून घेतली. यात सर्वत्रच स्वच्छतेची ऐसीतैसी होत असल्याचे वास्तव चित्र पाहणीदरम्यान उजेडात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शासनाच्या लाखो रूपयांच्या निधीतून फुलेवार्ड, खरपुंडी नाक्याकडे जाणारा बायपास मार्ग, हनुमान वार्डातील आठवडी बाजार, तसेच दैनंदिन गुजरी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालय व मूत्रिघराचे बांधकाम केले. मात्र या एकाही शौचालय व मूत्रिघरात पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच येथील स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष झाल्याने गडचिरोली शहरातील सारेच शौचालय व मूत्रिघर घाणीच्या विळख्यात सापडले आहे.
२७ लाखांचा खर्च; एकाही शौचालयाचा वापर नाही
एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत बीआरजीएफ निधीतून सन २००९-१० व २०१०-११ तसेच २०१२-१३ या तीन वर्षांच्या कालावधीत ३२ ग्रामपंचायतीमध्ये २७ लाख रूपये खर्च करून एकूण ३८ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आले. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी या शौचालयात पाण्याची कुठलीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे सदर शौचालयाचा वापर अद्यापही होत नसल्याची माहिती आहे. अनेक शौचालयातील सीट, पाईपलाईन तुटले असून दारे तुटलेली आहेत. तर काही शौचालये निर्मितीपासूनच कुलूपबंद आहेत. परिणामी प्रत्येक शौचालयासाठी खर्च करण्यात आलेले ७० हजार रूपये व्यर्थ गेले आहे.
चामोर्शी शहरात बसस्टॉप, लक्ष्मीगेट, वाळवंटी चौक व आठवडी बाजार परिसरात मिळून एकूण चार सार्वजनिक मूत्रिघर उभारण्यात आले. बसस्थानक परिसरात महिला व पुरूषांसाठी दोन स्वतंत्र मूत्रिघराची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुरूषांसाठी असलेले मूत्रिघर पावसामुळे कोसळले. त्यामुळे पुरूषांची लघुशंकेसाठी चांगलीच पंचाईत होत आहे. महिलांच्या मूत्रिघरात स्वच्छतेचा अभाव आहे. वाळवंटी चौकातील मूत्रिघरात घाण पसरली असून दुर्गंधी निर्माण झाली आहे.
४देसाईगंज शहरात हनुमान वार्डात तीन वार्डातील नागरिकांसाठी एकमेव स्वच्छतागृह आहे. मात्र या ठिकाणी वीज व पाण्याची व्यवस्था नसल्याने सदर शौचालयाची दुरवस्था झाली आहे. आरमोरी मार्गावरील बसस्थानकावर नगर पालिकेने मूत्रिघर बांधले आहे. भाजीपाला बाजाराच्या बाजुला फायबर मूत्रिघर बसविले आहे. मात्र येथे स्वच्छता नसल्याने नागरिकांना नाकावर रूमाल ठेवून ये-जा करावे लागते.
४अहेरी शहरात सन २०१२-१३ मध्ये राज्यसभा सदस्य गोविंदराव आदिक यांच्या स्थानिक विकास निधीतून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या कायम दुर्लक्षितपणामुळे सदर शौचालयात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीर बाबुराव चौकात बसविण्यात आलेल्या फायबर मूत्रिघराची अवस्था बिकट आहे. या मूत्रिघराचे दारे तुटलेली असून ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच खासगी जागेत ठेवण्यात आलेल्या फायबर मूत्रिघराचा अद्यापही वापर झाला नाही.
५गडचिरोलीच्या बाजारातील शौचालय कुलूपबंद
४स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने लाखो रूपये खर्च करून खासगी कंत्राटदारामार्फत हनुमान वार्डातील आठवडी बाजार परिसरात महिला व पुरूषांसाठी सार्वजनिक सुलभ शौचालय बांधण्यात आले. याला तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र सदर शौचालय कुलूप बंद आहे. न.प. प्रशासनाला सदर शौचालय सुरू करण्याचा अद्यापही मुहूर्त सापडला नाही, असे म्हणावे लागेल.
४आरमोरी शहरात एकूण १० सार्वजनिक शौचालय व १० मूत्रिघर आहेत. येथील सारेच शौचालय व मूत्रिघरामध्ये कचरा पडला असून घाण निर्माण झाली आहे. परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. वार्ड क्रमांक सहा मधील मूत्रिघराची अवस्था दयनिय आहे. बसस्टँड परिसरातील शौचालय व मूत्रिघरात मलमूत्र, सांडपाणी व प्रचंड घाण साचली आहे. जुन्या बसस्टँड परिसरात महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय अद्यापही कुलूपबंद आहे. यामुळे महिलांची प्रचंड पंचाईत होत आहे. वार्ड क्रमांक एक मधील विठ्ठल मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या आठही सार्वजनिक शौचालयात पाण्याच्या व्यवस्थेचा अभाव आहे.
कुरखेडा शहरात नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने बाजार परिसरात चार ठिकाणी सार्वजनिक मूत्रिघर व एका ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्वच्छतेकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरात प्रचंड घाण निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. जुने बसस्थानक परिसर, गुजरी, तालुका न्यायालयाच्या समोर असलेल्या सार्वजनिक मूत्रिघराची अवस्था बकाल झाली आहे. कुरखेडा शहरात नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने बाजार परिसरात चार ठिकाणी सार्वजनिक मूत्रिघर व एका ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्वच्छतेकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरात प्रचंड घाण निर्माण झाली असून दुर्गंधीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. जुने बसस्थानक परिसर, गुजरी, तालुका न्यायालयाच्या समोर असलेल्या सार्वजनिक मूत्रिघराची अवस्था बकाल झाली आहे.
शहरातील सार्वजनिक शौचालय व मूत्रिघराची साफसफाई करण्यासाठी नगर पंचायतीने दोन सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आठवड्यातून एक दिवस फिनाईल टाकून शौचालय व मूत्रिघरांची स्वच्छता या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. पाण्याच्या साठवणुकीसाठी टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र नागरिकांनी नळाच्या तोट्या चोरून नेल्यामुळे नळ बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर नागरिक योग्य प्रकारे करीत नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे.
- एन. जे. कोतकोेंडावार, कर्मचारी,
स्वच्छता विभाग नगर पंचायत आरमोरी
बसस्टॉप परिसरातील पावसाने पडझड झालेल्या ठिकाणी नव्याने मूत्रिघर बांधण्याचे प्रस्तावित आहे. तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मूत्रिघराचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मूत्रिघराची स्वच्छता सफाई कामगारांकडून केली जाईल.
- यू. जी. वैद्य, प्रशासक,
नगर पंचायत, चामोर्शी
कोरची येथे नगर पंचायत स्थापन होऊनही सार्वजनिक शौचालय व मूत्रिघराची व्यवस्था करण्यात आली नाही. कोरची हे मुख्य बाजारपेठ तसेच शासकीय कार्यालयाचे ठिकाण असल्याने दररोज शहरात मोठी गर्दी असते. मात्र शौचालय व मूत्रिघर नसल्याने साऱ्यांचीच पंचाईत होते. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने तत्काळ कोरची शहरात शौचालय व मूत्रिघराची व्यवस्था करावी.
- मनीषा राष्ट्रपाल नखाते,
महिला कार्यकर्त्या, कोरची