आजचा युवक आत्मकेंद्रित; सामाजिक समस्या साेडविण्याकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:24+5:302021-06-05T04:26:24+5:30

देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि राष्ट्रनेत्यांच्या स्वप्नातील ...

Today's youth are self-centered; Lessons turned to solving social problems | आजचा युवक आत्मकेंद्रित; सामाजिक समस्या साेडविण्याकडे फिरविली पाठ

आजचा युवक आत्मकेंद्रित; सामाजिक समस्या साेडविण्याकडे फिरविली पाठ

देसाईगंज येथील आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि राष्ट्रनेत्यांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावरील आभासी वक्तृत्व स्पर्धा आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह बिहार,पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटक विद्यापीठ, धारवाड अंतर्गत गुडलेप्पा हल्लीकेरी महाविद्यालय, हवेरी, कर्नाटक येथील विद्यार्थिनी ऐश्वर्या मंजुनाथ मानेगार हिने पटकावले, तर द्वितीय क्रमांक गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी, (महाराष्ट्र) येथील विद्यार्थिनी प्रियंका श्यामराव ठाकरे हिने पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.एच.बी. धोटे, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ.जे.पी. देशमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. निहार बोदेले यांनी केले. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे १ हजार व ५०० रुपये किमतीचे ग्रंथ साहित्य व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयाे विभागाच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यशस्वीतेसाठी प्रा. निहार बोदेले, प्रा. नीलेश यांनी सहकार्य केले.

Web Title: Today's youth are self-centered; Lessons turned to solving social problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.