विदर्भ गर्जना यात्रेचा आज जिल्ह्यात प्रवेश
By Admin | Updated: March 1, 2015 01:37 IST2015-03-01T01:37:37+5:302015-03-01T01:37:37+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ गर्जना यात्रा काढली आहे. सदर यात्रा उद्या १ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे,...

विदर्भ गर्जना यात्रेचा आज जिल्ह्यात प्रवेश
गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ गर्जना यात्रा काढली आहे. सदर यात्रा उद्या १ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, अशी माहिती अरूण मुनघाटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
विदर्भ गर्जना यात्रेचा २८ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे मुक्काम आहे. सदर यात्रा देसाईगंज येथे सायंकाळी ५ वाजता येणार आहे. या ठिकाणी सभा घेतली जाणार आहे. त्यानंतर आरमोरी येथे आरमोरी येथे सायंकाळी ७ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेनंतर आरमोरी येथेच गर्जना यात्रेचा मुक्काम राहणार आहे. २ मार्च रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभिड, सिंदेवाही, सावली, मूल येथे सभा घेतल्यानंतर गोंडपिंपरी मार्गे चामोर्शी येथे प्रवेश करणार आहे. चामोर्शीत ११.३० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात दुपारी २ वाजता समारोपीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला नगराध्यक्ष निर्मला मडके, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले, मार्गदर्शक म्हणून माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशिकर, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवती, धनंजय धार्मिक, धर्मराज रेवतकर, माजी मंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, अॅड. नंदा पराते, पारोमिता गोस्वामी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अरूण पाटील मुनघाटे यांनी दिली आहे.