६ कोटी ४५ लाखांचे धान चुकारे थकीत

By Admin | Updated: January 25, 2016 01:52 IST2016-01-25T01:52:40+5:302016-01-25T01:52:40+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी

Tired of paddy worth 6 crores 45 lakhs | ६ कोटी ४५ लाखांचे धान चुकारे थकीत

६ कोटी ४५ लाखांचे धान चुकारे थकीत

शेतकरी अडचणीत : आतापर्यंत २४ कोटींची धान खरेदी
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत एकूण ५५ धान खरेदी केंद्रांवर १४ नोव्हेंबर २०१५ पासून आतापर्यंत २४ कोटी २० लाखांची धान खरेदी झाली आहे. यापैकी २१ जानेवारी २०१६ पर्यंत ९ कोटी ४० लाख ५६ हजार ९१२ रूपयांच्या धान खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. सहकारी संस्थांनी हुंड्या न वटविल्यामुळे अद्यापही ६ कोटी ४५ लाख ४३ हजार ८४९ रूपयांचे धानाचे चुकारे थकले आहेत. परिणामी आाधीच दुष्काळी परिस्थितीत असलेले शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने आधारभूत खरेदी योजनेंतर्गत एकूण ३९ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या धान खरेदी केंद्रांवर २१ जानेवारीपर्यंत १५ कोटी ८६ लाख ७६२ रूपये किमतीच्या १ लाख १२ हजार ४८२ क्विंटल धान खरेदी झाली आहे. अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आधारभूत खरेदी योजनेतून एकूण १६ केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवर आतापर्यंत ६ कोटी ४५ लाख ३४ हजार २१९ रूपये किमतीच्या ४५ हजार ७६८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत आतापर्यंत ६ हजार ८४० शेतकऱ्यांनी सहकारी संस्थांच्या केंद्रावर धानाची विक्री केली आहे. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण १० संस्थांच्या १० केंद्रांवरून आतापर्यंत ४ कोटी ८१ लाख ७६ हजार ४५७ रूपये किमतीच्या ३४ हजार १६७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ११ केद्रांवरून आतापर्यंत ३ कोटी ६६ लाख ९ हजार ९१ रूपये किमतीच्या २५ हजार ९६४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ९ केंद्रांवर आतापर्यंत ३ कोटी २३ लाख ४३ हजार ७९२ रूपये किमतीच्या २२ हजार ९३८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत सहा केंद्रांवर आतापर्यंत २ कोटी ३३ लाख ७८ हजार १२४ रूपये किमतीच्या १६ हजार ५८० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. तसेच घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ केंद्रांवरून आतापर्यंत १ कोटी ८० लाख ९२ हजार ६९७ रूपये किमतीच्या १२ हजार ८३१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

२३ हजार क्विंटल धानाची उचल
४उघड्यावरील धानाची नासाडी झाल्याने आदिवासी विकास महामंडळ गेल्या चार-पाच वर्षात प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे यंदा उघड्यावर धान खरेदी करण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. गोदाम व ओट्यांची व्यवस्था असणाऱ्या केंद्रांवरच यावर्षी धानखरेदी सुरू आहे. महामंडळाने भरडाईची प्रक्रियासुध्दा गतीने सुरू केली आहे. ओट्यावर खरेदी केलेल्या एकूण २३ हजार ४७५ क्विंटल धानाची उचल भरडाईसाठी आतापर्यंत करण्यात आली आहे. तर उर्वरित धानसाठा गोदामात सुरक्षित असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे.

एकाधिकार योजनेतून दीड कोटींची धान खरेदी
४आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ३९ केंद्रांवरून आतापर्यंत १ कोटी ५७ लाख ५६ हजार २११ रूपये किमतीच्या एकूण ७ हजार ६४५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाचे ३० लाख ४४ हजार ३९८ रूपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे थकीत आहेत.

गोदामअभावी ११ केंद्रांच्या ठिकाणी ओट्यावरच सुरू आहे खरेदी
४आदिवासी विकास महामंडळांतर्गत अनेक सहकारी संस्थांकडे स्वत:च्या मालकीचे गोदाम नाहीत. तसेच धान साठवणुकीची पुरेशी व्यवस्थाही नाही. यंदा जिल्हा प्रशासनाने उघड्यावर धान खरेदी करू नये, असे सक्त निर्देश दिले. त्यामुळे संस्थांनी ओटे बांधकाम केले आहे. जिल्ह्यात ११ धान खरेदी केंद्रांवर ओट्यांवरून धान खरेदी केली जात आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील आठ, कोरची तालुक्यातील दोन, आरमोरी तालुक्यातील एका केंद्राचा समावेश आहे.

Web Title: Tired of paddy worth 6 crores 45 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.