टिपुराने उजाळले मार्कंडेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:14 IST2018-02-16T00:13:31+5:302018-02-16T00:14:45+5:30
मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

टिपुराने उजाळले मार्कंडेश्वर मंदिर
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरावर तेल व तुपाचा टिपूर (दिवा) गुरूवारी सायंकाळी लावण्यात आला. टिपूर लावताना बघण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे मंदिराच्या गाभाऱ्यात महापूजा केली जाते व जत्रेला सुरूवात होते. अमावस्येच्या रात्री मार्कंडेश्वराच्या मंदिरावर टिपूर लावण्याची परंपरा आहे. टिपूर लावण्याच्या दिवशी सुध्दा जत्रेमध्ये मोठी गर्दी उसळते. परंपरेनुसार सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील राजू म्हशाखेत्री व प्रशांत म्हशाखेत्री यांनी सव्वा किलो तुपाचा टिपूर तर व्याहाड खुर्द येथीलच सुखदेव गुरनुले यांनी तेलाचा दिवा लावला. यावेळी तहसीलदार अरूण येरचे, पीआय प्रदीप लांडे, पुरातत्व विभागाचे सहायक सवरक्षक पचिने, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, रामू तिवाडे, मनोज रणदिवे, पंकज पांडे, अरूण गायकवाड, उज्वल गायकवाड, नेहरू राणे, रामू गायकवाड, पुरातत्व विभागाचे छबीलदास सुरपाम आदी उपस्थित होते.मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू असल्याने यावर्षी मुख्य मंदिराच्या उजव्या बाजुकडील कळसावर टिपूर लावण्यात आला. मार्कंडेश्वर मंदिरावरील टिपूर हा रामटेक येथे दिसत होता. अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामीण भागातील बहुतांश भाविक टिपूराला महत्त्व देत असल्याने टिपूर लावण्याच्या दिवशी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतात.