पारंपरिक लावणीतून थिरकला नृत्याविष्कार
By Admin | Updated: March 4, 2017 01:23 IST2017-03-04T01:23:26+5:302017-03-04T01:23:26+5:30
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने एकाहून सरस मराठमोळी लावणी सादर करून गडचिरोली येथील रसिक प्रेक्षकांना गुरूवारी मंत्रमुग्ध केले.

पारंपरिक लावणीतून थिरकला नृत्याविष्कार
सखी मंचतर्फे बहारदार लावणी कार्यक्रम : सुरेखा पुणेकर व संचाने रसिकांना केले मंत्रमुग्ध
गडचिरोली : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने एकाहून सरस मराठमोळी लावणी सादर करून गडचिरोली येथील रसिक प्रेक्षकांना गुरूवारी मंत्रमुग्ध केले. औचित्य होते सखी मंचच्या वतीने आरमोरी मार्गावरील परिणिता लॉनमध्ये आयोजित सुरेखा पुणेकर यांच्या बहारदार लावणी कार्यक्रमाचे.
बहारदार लावणी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील, नगरसेविका वर्षा बट्टे, नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, अमोल प्रभाकर आखाडे, वृंदा बोमनवार, नलिनी बोरकर, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी व सखी मंचच्या संस्थापक स्व. ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलनाने झाली.
त्यानंतर लावणी कार्यक्रमाला सुरूवात झाली. ‘या रावजी, बसा भावजी’, ‘पिकल्या पानांचा देठ हिरवा’, ‘कारभारी दमान’, ‘झाल्या तिन्ही सांजा’ यासह बहारदार लावण्या सुरेखा पुणेकर व त्यांच्या संचाने सादर केल्या. सामाजिक विषयासह विविधरंगी बहारदार लावण्यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. लावणी कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य महिला व पुरूष रसिकांनी गर्दी केली होती. बहारदार लावणी संपताच टाळ्यांच्या कडकडाटात प्रत्येक लावणीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत होता. एकूणच, बहारदार लावणी कार्यक्रम हजारो प्रेक्षकांच्या प्रतिसादाने पार पडला.
उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा रामटेके तर आभार लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रश्मी शेखर आखाडे, युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका वर्षा पडघन, बाल विकास मंचच्या जिल्हा संयोजिका किरण पवार, सोनिया बैस, अंजली वैरागडवार, सुनीता तागवान, अर्चना भांडारकर, मंगला बारापात्रे, वंदना दरेकर, उषा भानारकर, पूष्पा पाठक, भारती खोब्रागडे, उज्ज्वला साखरे, रोहिणी मेश्राम, सुनीता उरकुडे, स्वाती पवार, कल्पना लाड, सपना मुलकलवार, अंजली देशमुख, अमोल श्रीकोंडावार, शारदा खंडागडे पुष्पलता देवकुले व अन्य सखींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)