वीज पडून तीन महिला जखमी
By Admin | Updated: November 13, 2014 23:01 IST2014-11-13T23:01:33+5:302014-11-13T23:01:33+5:30
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या वालसरा येथील एका शेतात धान कापणीचे काम करीत असतांना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या. सदर घटना दुपारच्या सुमारास घडली.

वीज पडून तीन महिला जखमी
चामोर्शी : तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या वालसरा येथील एका शेतात धान कापणीचे काम करीत असतांना वीज पडून तीन महिला जखमी झाल्या. सदर घटना दुपारच्या सुमारास घडली.
मनिषा नीलकंठ संनडुके (३५), महानंदा उमाजी मडावी (३६), मंदाबाई श्यामराव मुलकलवार (४०) सर्व रा. वालसरा असे जखमी झालेल्या महिलांचे नाव आहे. वालसरा येथे धानपीक कापणीचा हंगाम जोरात असल्याने मंगलदास सातपुते यांच्या शेतात सदर महिला धान कापणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारी १ वाजताच्या सुमारास दुपारचे जेवण आटोपून धान कापणीचे काम करीत असतांना मेघ गर्जनेसह पाऊस झाला. दरम्यान अचानक वीज कडाडून शेतात काम करणाऱ्या महिलांच्या आसपास कोसळली. त्यामुळे सदर तिनही महिला जखमी झाल्या. जखमी महिलांना चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सध्य:स्थितीत जखमी महिला रूग्णालयात उपचार घेत असून चामोर्शीचे तहसीलदार अशोक कुंभरे, पं. स. चे उपसभापती केशव भांडेकर यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन जखमी महिलांची विचारपूस केली. तहसीलदार अशोक कुंभरे यांनी नैसर्गिक आपत्ती योजनेंतर्गत जखमी महिलांना प्रत्येकी ९ हजार ३०० रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमी महिलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. बिधान देवरी उपचार करीत आहेत. सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
(शहर प्रतिनिधी)