जप्त केलेले तीन ट्रक पसार

By Admin | Updated: March 3, 2017 01:06 IST2017-03-03T01:06:25+5:302017-03-03T01:06:25+5:30

गोदावरी नदीतून तेलंगणा राज्यात रेतीची अवैध तस्करी करीत असलेली ६९ वाहने पकडण्यात आली होती.

Three truck seized seized | जप्त केलेले तीन ट्रक पसार

जप्त केलेले तीन ट्रक पसार

सिरोंचा तहसील कार्यालयातून : प्रशासनात खळबळ; वाहनांचा शोध सुरू
सिरोंचा : गोदावरी नदीतून तेलंगणा राज्यात रेतीची अवैध तस्करी करीत असलेली ६९ वाहने पकडण्यात आली होती. यापैकी १६ ट्रक सिरोंचा तहसील कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आली होती. मात्र यापैकी तीन ट्रक १ मार्चच्या रात्री फरार झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राममूर्ती व अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजा यांनी ११ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकून ६९ वाहने पकडली होती. यापैकी २७ ट्रक रेतीने भरले होते. रेतीने भरलेल्या ट्रकपैकी ११ ट्रक सिरोंचा पोलीस स्टेशनच्या आवारात तर १६ ट्रक सिरोंचा तहसील कार्यालयाच्या पटांगणात ठेवण्यात आले होते. या १६ ट्रकपैकी टीएस ०५ यूबी १४५८, टीएस यूबी ३९३७, टीएस ०८ यूई ३४० या क्रमांकाचे तीन ट्रक १ मार्चच्या रात्रीच्या सुमारास रेती तहसीलमध्येच रिचवून पसार झाले आहेत. ट्रक पसार झाल्याची बाब गुरूवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. कारवाई होईल या भितीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, याची खबरदारी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत होती.
फरार झालेल्या वाहनांबाबात सिरोंचाचे तहसीलदार कुमरे यांना विचारणा केली असता, सदर ट्रक बॅटरी खराब झाल्याने ते दुरूस्तीसाठी नेले असल्याचे सांगितले. मात्र दुसऱ्याच क्षणी याबाबत एफआयआर नोंदविला जाईल, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. जप्त करून ठेवलेले ट्रक विनापरवानगीने कसे काय नेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रक गहाळ होण्यामागे सिरोंचा तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three truck seized seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.