गडचिरोली व धानोरात तीन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:59+5:30

वैनगंगा नदीच्या कनेरी नदीघाटातून रेतीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, तलाठी अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्या पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. दोन्ही ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने टीपीचा प्रश्नच उद्भवत नाही. हे दोन्ही ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

Three tractor seized in Gadchiroli and Dhano | गडचिरोली व धानोरात तीन ट्रॅक्टर जप्त

गडचिरोली व धानोरात तीन ट्रॅक्टर जप्त

ठळक मुद्देतहसीलमध्ये जमा : गडचिरोलीतील भाजप नगरसेवकाच्याही ट्रॅक्टरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/धानोरा : महसूल विभागाने कारवाई करून वैनगंगा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन तर धानोरा तालुक्यातील सालभट्टी नदी घाटातून रेती चोरी करणारे एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. यात गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तथा भाजपचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचा एक व कनेरी येथील मनीष कोतपल्लीवार यांच्या मालकीचा एक ट्रॅक्टर आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अनधिकृतपणे रेतीची वाहतूक करताना काटवे यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला होता.
वैनगंगा नदीच्या कनेरी नदीघाटातून रेतीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, तलाठी अजय तुंकलवार, गणेश खांडरे यांच्या पथकाने मुरखळा गावाजवळ सापळा रचला. दोन्ही ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने टीपीचा प्रश्नच उद्भवत नाही. हे दोन्ही ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
अवैधपणे रेतीची वाहतूक करणारा एमएच ३३, एस २२६६ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. सदर ट्रॅक्टरवर १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई मध्यरात्री १२.२० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गणेश सुधाकर भुपतवार असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. सदर ट्रॅक्टर सालेभट्टी नदी घाटातून रेतीची चोरी करीत असताना आढळून आला. धानोराचे प्रभारी तहसीलदार महेंद्र गणवीर रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना ट्रॅक्टर आढळून आला. सालेभट्टी बसस्थानकावर ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, ट्रॅक्टरमध्ये रेती आढळून आली. सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे.

Web Title: Three tractor seized in Gadchiroli and Dhano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.