आलापल्ली वन विभागात तीन ट्रॅक्टर जप्त
By Admin | Updated: January 9, 2016 01:50 IST2016-01-09T01:50:04+5:302016-01-09T01:50:04+5:30
आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयाने शुक्रवारी अवैध वाळू व रेती नेणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले.

आलापल्ली वन विभागात तीन ट्रॅक्टर जप्त
आलापल्ली : आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वन परिक्षेत्र कार्यालयाने शुक्रवारी अवैध वाळू व रेती नेणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले.
अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. एस. आत्राम यांनी सध्या अवैध धंद्यावर आळा बसविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी एमएच ३३-९८५४ क्रमांकाचा पेंटय्या चंद्रय्या गंगापुरीवार रा. नागेपल्ली, एमएच ३३ एफ ३४५४ क्रमांकाचा लच्चू केका गावडे रा. बुर्गी तसेच एमएच ३३ एफ ३३८५ क्रमांकाचा राजेश वर्धलवार रा. अहेरी यांचा ट्रॅक्टर अवैध रेती, गिट्टीची वाहतूक करताना जप्त करण्यात आला. तिन्ही ट्रॅक्टरचे चालक आणि १२ मजुरांवर अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. आत्राम यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे वनपाल चंद्रशेखर तोम्बर्लावार, वनपाल जी. एल. नवखरे, पी. एस. बुटे, आर. एस. मडावी, आर. आर. वासेकर, एस. एस. गुरनुले, पी. एम. नंदगिरीवार, व्ही. जी. लांजेवार, नितीन कुमरे, चंद्रकांत सडमेक यांनी पार पाडली. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले. (वार्ताहर)