पावणे तीन लाखांचा तंबाखू व भेसळ माल जप्त
By Admin | Updated: December 4, 2015 01:44 IST2015-12-04T01:44:57+5:302015-12-04T01:44:57+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज येथील नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सन्नी कम्फेक्शनरी दुकानावर धाड टाकून सुमारे ..

पावणे तीन लाखांचा तंबाखू व भेसळ माल जप्त
देसाईगंजच्या व्यावसायिकावर धाड : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
देसाईगंज : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज येथील नगर परिषदेच्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सन्नी कम्फेक्शनरी दुकानावर धाड टाकून सुमारे पावणे तीन लाखांचा सुगंधीत तंबाखू व भेसळ खाद्य पदार्थ जप्त केले आहेत. याबाबत दुकानमालक प्रकाश कन्हैयालाल उदासी याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
सन्नी कम्फेक्शनरी या दुकानात राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू व गुटख्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मोहन केंबळकर व अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांनी सन्नी कम्फेक्शनरी दुकानावर गुरूवारी धाड टाकली. धाडीदरम्यान कम्फेक्शनरीच्या दुकानात सुगंधीत तंबाखाचे २०० ग्रॅमचे ३४० डबे व ५० ग्रॅमचे ८० डबे आढळून आले. त्याची किमत १ लाख ५६ हजार ७०० एवढी होते. पानमसाल्याचे ९० ग्रॅमचे १७५ पॉकिट आढळून आले. त्याची किमत ८ हजार ५५० रूपये होते. त्याचबरोबर सुपर नावाच्या गुटख्याचे १२० ग्रॅमचे पाच पॉकीट व जाफरानी जर्दाचे ५० ग्रॅमचे ७० पॉकेट आढळून आले. त्याची किमत ६ हजार ४२० रूपये होते. असा एकूण १ लाख ७१ हजार ८७० रूपयांचा प्रतिबंधीत तंबाखू व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
कारवाईनंतर उदासी याच्याविरोधात रात्री उशीरापर्यंत देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र वृत्त लिहिपर्यंत उदासी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (वार्ताहर)