दाेन दिवसांत तीन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:37+5:302021-06-05T04:26:37+5:30
चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे विदेशी व देशी दारू अवैधरीत्या बाळगून विक्री करत असल्याच्या प्राप्त माहितीनुसार निरंजन रामदास भगत याच्या ...

दाेन दिवसांत तीन लाखांची दारू जप्त
चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे विदेशी व देशी दारू अवैधरीत्या बाळगून विक्री करत असल्याच्या प्राप्त माहितीनुसार निरंजन रामदास भगत याच्या राहत्या घरी प्रोहिबिशन रेड केली असता, ८२ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आढळून आली. ही दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत त्याच्याविराेधात चामाेर्शी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चामाेर्शीचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस नाईक जीवन हेडावू, सहाय्यक फौजदार दादाजी करकाडे, पोलीस हवालदार नीलकंठ पेंदाम, महिला पोलीस नाईक पुष्पा कन्नाके, पोलीस नाईक शुक्राचारी गवई, मंगेश राऊत, शेषराज नैताम, राज्य उत्पादन शुल्क विभाग, गडचिरोली यांचे निरीक्षक एन. एस. धुरड, दुय्यम निरीक्षक सी.एम. खारोडे, के.एन. देवरे व विलास महाफुलकर यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.
देसाईगंज पाेलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून दोन लाख ११ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. देसाईगंजातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाॅर्डातील आकाश खुशाल सिडाम (२५) याच्याकडून ३० हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. भगतसिंग वाॅर्डातील चंदन बकाराम खरकाटे (३२) याच्याकडून एक हजार ५०० रुपयांची दारू, कमलानगर वाॅर्डातील सैफखान शहशाखान (२२), शिवाजी वाॅर्डातील नागेश माेरेश्वर गेडाम (२६) या दाेघांकडून २९ हजार रुपये किमतीची दारू व ८० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण एक लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजी वाॅर्डातील सुल्तान मेहमूद खान (२०), भगतसिंग वाॅर्डातील शिफान सरफद्दीन सय्यद (२२) यांच्याकडून ७१ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
===Photopath===
040621\img-20210604-wa0167.jpg
===Caption===
भेंडाळा येथील पकडलेल्या अवैध दारू सह पोलीस अधिकारी व कर्मचारी फोटो