शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

तीन दारुडे शिक्षक निलंबित, मद्यप्राशन करुन शाळेत यायचे गुरुजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 7:53 PM

या तिन्ही शिक्षकांचे शाळांना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली असता हे तिन्ही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत येत असल्याचे दिसून आले.

कोरची (गडचिरोली) : मद्य प्राशन करून शाळेत येणाऱ्या तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºया तीन शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. रानगट्टा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मुरारी पडोटी, आंबेखारी जिल्हा परिषद शाळेचे टिकाराम दौलत पुडो व जांभळी शाळेचे शिक्षक रामू  दुलाराम हलामी असे निलंबित केलेल्या शिक्षकांचे नावे आहेत. 

या तिन्ही शिक्षकांचे शाळांना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली असता हे तिन्ही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिघांवरही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित कालावधीत नारायण पडोटी यांना पंचायत समिती गडचिरोली, टिकाराम पुडो यांना पंचायत समिती आरमोरी व दुलाराम हलामी यांना पंचायत समिती वडसा येथे नेमणूक देण्यात आली आहे. मागील काही दिवसात कोरची तालुक्यातील चार शिक्षक निलंबित झाले आहेत. 

या सर्व शिक्षक मद्य प्राशन करण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. यावरून दुर्गम भागात कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतरही तालुक्यांमध्ये काही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत जातात. तसेच अनेक दिवस शाळेत जात नाही. त्यामुळे अशा शिक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळाGadchiroliगडचिरोली