नर्सेसच्या तीन मागण्या मंजूर

By Admin | Updated: December 21, 2015 01:35 IST2015-12-21T01:35:54+5:302015-12-21T01:35:54+5:30

परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...

The three demands of the nurses are approved | नर्सेसच्या तीन मागण्या मंजूर

नर्सेसच्या तीन मागण्या मंजूर

उपोषणाची सांगता : नर्सेसची अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा
गडचिरोली : परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य जि.प. नर्सेस संघटनेच्या वतीने १४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान, १६ व १८ डिसेंबर रोजी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन मागण्या मंजूर केल्या. त्यामुळे नर्सेसचे सदर आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
एएनएम व एलएचव्ही पदावर असलेल्या २१४ नर्सेसला नियमित करण्यात आले. १८४ नर्सेसला स्थायी करण्यात आले असून नर्सेसच्या कालबध्द पदोन्नतीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. सदर तीन मागण्या मंजूर झाल्या आहेत. यापुढील मागण्या मंजूर न केल्यास ४ जानेवारी २०१६ पासून विभागीय आयुक्त नागपूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा नर्सेस संघटनेचे अध्यक्ष माया सिरसाट, कल्पना रामटेके, मंदा आंबेकर, पाझारे, वंदना भारती यांनी दिली आहे. चर्चेदरम्यान जि.प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, दीपक चौधरी व नर्सेस उपस्थित होत्या. शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वाघ यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता केली. (प्रतिनिधी)

Web Title: The three demands of the nurses are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.