शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मामा-भाच्यासह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:58 IST

मुलचेरा येथील वन विकास महामंडळाच्या वसाहतीपासून जवळच कोपरअल्ली मार्गावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मामा-भाचा ठार झाले. तर इतर चार जण जखमी झाले. तसेच अहेरी-देवलमरी मार्गावर मोदुमतुरा येथे ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअनियंत्रित दुचाकींमुळे घात : मुलचेरा व अहेरी तालुक्यातील मोदुमतुरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा/अहेरी : मुलचेरा येथील वन विकास महामंडळाच्या वसाहतीपासून जवळच कोपरअल्ली मार्गावर गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने मामा-भाचा ठार झाले. तर इतर चार जण जखमी झाले. तसेच अहेरी-देवलमरी मार्गावर मोदुमतुरा येथे ट्रेलरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.मुलचेरा येथे झालेल्या अपघातात हरीशकुमार डे (१०) रा. चंद्रपूर, विष्णू घरामी (२४) रा. देशबंधूग्राम हे दोघे ठार झाले. तर अजय बारीकराव कुमरे (१९), दशरथ अरूण कन्नाके (१९) रा. मुलचेरा, चंपा सुखदेव रॉय (४०), शिल्पा गोपाल सरकार (१७) रा. विश्वनाथनगर हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. मुलचेरा येथून विश्वनाथनगर येथे शिल्पा गोपाल सरकार हिला सोडण्यासाठी अजय कुमरे व दशरथ कन्नाके हे दुचाकीने कोपरअल्लीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुलचेरा टोलाजवळ विरूध्द दिशेने विष्णू घरामी, हरिशकुमार डे व चंपा सुखदेव रॉय हे दुचाकीने येत होते. दोन भरधाव दुचाकींची जबर धडक झाली. या धडकेत भाचा हरीशकुमर डे याचा जागीच मृत्यू झाला तर मामा विष्णू घरामी यांना मुलचेरा ग्रामीण रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.अहेरी-देवलमरी मार्गावर झालेल्या अपघातात देवलमरी येथील विजय शंकर गवडेवार हा युवक ठार झाला आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. जेसीबी मशीन घेऊन जाणाऱ्या ट्रकने विजयच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये विजयचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात