भेडकीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:30+5:30
कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले.

भेडकीची शिकार करणाऱ्या तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वडेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ९४९ मध्ये भेडकीची (हरणाचा एक प्रकार) शिकार करणाऱ्या तिघांना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
हेमराज प्रभू कोराम रा. नान्ही, अशोक आत्माराम कोरेटी, मोहन सोनसाय घाटघुमर दोघेही रा. आंजनटोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. कुरखेडाचे क्षेत्र सहायक शिवशंकर कायते व वडेगावचे वनरक्षक राजेंद्र पाटील, नितूपालन नाकाडे हे जंगलात गस्तीवर असताना सिमेंट बंधाऱ्यावर तीन अज्ञात इसम संशयास्पद आढळून आले. तिथे जाऊन पाहणी केले असता, बंधाऱ्याच्या पायऱ्यांवर मांस आढळून आले. सदर मांस कशाचे आहे, असे शिकार करणाऱ्यांना विचारले असता, त्यांनी सदर मांस भेडकीचे असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांना देण्यात आली.
त्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना जामिनावर सोडले आहे. या घटनेचा तपास वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के व अधिनस्त कर्मचारी करीत आहेत.