‘जयभीम’च्या गर्जनेने महामानवाला हजारोंची आदरांजली

By Admin | Updated: April 15, 2016 01:55 IST2016-04-15T01:55:16+5:302016-04-15T01:55:16+5:30

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.

Thousands of thousands of devotees honored with 'Jayabhi' | ‘जयभीम’च्या गर्जनेने महामानवाला हजारोंची आदरांजली

‘जयभीम’च्या गर्जनेने महामानवाला हजारोंची आदरांजली

बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती : जिल्हाभरात अनेक कार्यक्रमांतून मार्गदर्शन; भीम रॅलींनी गाव व शहर दुमदुमले
गडचिरोली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, समाज मंडळांच्या वतीने व्याख्यान, विविध स्पर्धा व उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी विद्यालय, व महाविद्यालय आरमोरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष अब्दुल पंजवानी होते. प्रमुख वक्ते संजय मंगर, प्रमुख अतिथी नामदेवराव सोरते, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, सत्यनारायण चकीनारपवार, साईनाथ अद्दलवार, शरद जौंजाळकर, डॉ. उत्तमचंद कांबळे, उपस्थित होते. यावेळी प्रा. संजय मंगर यांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. रेवतकर यांनी केले.
अ‍ॅड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरिअल कला व वाणिज्य महाविद्यालय, मालेवाडा : अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयदेव लांजेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक सचिव सारंग बनपूरकर, सुरेश मंडपे, प्रा. दिलीप नंदेश्वर, हिरामण उईके, दीपक बनपूरकर, राहूल वालदे, अविनाश जांभुळे, देवेंद्र सेलोकर, मनोज समर्थ उपस्थित होते. सकाळी गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर निबंध, भावगीत, रांगोळी, वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. संचालन प्रा. हिवराज राऊत तर आभार प्रा. गुलाब बावनथडे यांनी मानले.
जि. प. प्राथमिक शाळा, मुरखळा (चक) : कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष साईनाथ कुनघाडकर, वर्षा बट्टे, अनिता कन्नाके, देऊरमले, कांता बोरकर, प्रफुल वाळके, सुषमा सरपे, श्वेता ठेमस्कर, वंदना दुर्गे, देऊरमला, हायसूला, वाळके, खेवले, अनिल मेश्राम उपस्थित होते. संचालन प्रज्वल वाळके तर आभार रोहित बोरकर यांनी मानले.
गणेश अलंकार विद्यालय, निमगाव : कार्यक्रमाजी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळकृष्ण सावसाकडे होते. मार्गदर्शक बालाजी नगराळे, गांधीजी कुकूडकार, भूवनेश्वर गजबे, बबलू गेडाम, ज्ञानेश्वर लोहारे, मधुकर शिवणकर उपस्थित होते. प्रास्ताविक दिवाकर भोयर, संचालन संदीप नागदेवते व आभार विलास नाकतोडे यांनी मानले.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपअभियंता बी. टी. वरलाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून शाखा अभियंता बी. टी. वासेकर, सी. आर. पाल, पी. डी. राजे, बी. जी. कुंभारे, आर. पी. गराटे, ए. डी. बाबरे, एन. वाय. मानकर, सी. व्ही. साळवे, यू. व्ही. मांढरे, आत्राम, गेडाम, गणवीर, रायपुरे उपस्थित होते.
मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज : अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश रेवतकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सनीर बोदेले उपस्थित होते. यावेळी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन प्रा. कृणाल हिवसे, प्रास्ताविक डॉ. पंकज चौधरी तर आभार संजय बुराडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. नाजीम शेख, प्रा. डॉ. कुशल लांजेवार, नंदकिशोर अटाळकर, वैशाली ब्राम्हणे, नितीन पाथोडे, महेंद्र घोडेस्वार, सतीश मेश्राम यांनी सहकार्य केले.
इंदिरा गांधी हायस्कूल, सुभाषग्राम : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतीश रॉय होते. यावेळी प्रा. मजूमदार, वानखेडे, पोरेड्डीवार उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. संचालन सचिन बोरकुटे तर आभार सत्यसरण गाईन यांनी मानले.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका पौर्णिमा शिंपी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बार्टीच्या मोहुर्ले उपस्थित होत्या. यावेळी वैष्णवी मेश्राम, सोनी कुमोटी, मेनका अलनिया, वैभवी क्षीरसागर, प्रणाली तुलावी यांनी मनोगत व्यक्त केले. बडोले, वालदे, वालकर, टेंभुर्णे यांनी गीतगायन केले. संचालन रूपाली जाळे हिने केले. यशस्वीतेसाठी कुंडे, उंदीरवाडे, धुरके, गाडगे, जांभुळे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विकास विद्यालय, कुरखेडा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के. रामटेके होते. यावेळी एच. टी. मेश्राम, डी. जे. पडोळे, डी. एम. शेंडे, आर. एम. अलगदेवे, मुकेश खोब्रागडे, पुस्तोडे, सुरेखा शेगावकर, सोनकुकरा, लुकेश फुलबांधे उपस्थित होते. संचालन पुस्तोडे यांनी केले. यशस्वीतेसाठी देशमुख, बागडे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
हितकारिणी विद्यालय, आरमोरी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ्रएस. बी. राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य पी. एम. तितीरमारे, पर्यवेक्षक एन. ए. ढोंगे, प्रा. एस. ए. तांबोले, एन. ए. ज्ञानबोनवार, डी. जी. बुद्धे, एन. जे. ढोले, भांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन एम. जे. मने तर आभार जयदास फुलझेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. पाचपांडे, प्रा. कुथे, प्रा. मुळे, शेंडे, प्रा. भाग्यवान मेश्राम, भावे, रूपराज निमजे, दादाजी चौधरी, अरूण मेश्राम, सतीश धात्रक, शारदा श्रीरामे, टिचकुले, प्रशांत नारनवरे, हेडाऊ, सिडाम, कामडी, टी. डी. रामटेके, शफी कुरेशी, श्याम बहेकार, व्ही. व्ही. मानकर व कर्मचारी उपस्थित होते.
केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जे. आर. वाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. पंकज मडावी, तुषार पाकवार, डॉ. जया तुमडाम उपस्थित होत्या. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्याची चित्रफित दाखविण्यात आली. विद्यार्थी रिंकेश अंबादे, दिव्या शिवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन पराग सहारे तर आभार युगा झाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्याम भैसारे, भरणे, देवराव ठाकरे, संदीप रहाटे, राहूल मानकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, शिवणी (बूज) : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका चंद्रकला बारापात्रे, प्रमुख अतिथी म्हणून देविदास बांडे, रजनी मातेरे, नामदेव खोडवे, सुरेश मडावी, सुनील शिवहरे, मुरलीधर सातपुते, सुनील चरडुके, योगेश वाढई उपस्थित होते. सकाळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात नाजुका दुमाने, प्रशांत दोनाडकर, पूनम बांडे यांनी अनुक्रमे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक सुरेश मडावी, संचालन गुलाब मने तर आभार डिमराव तिजारे यांनी मानले.
ग्राम पंचायत कार्यालय शिवणी बूज येथील आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेश्वर ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच पुरूषोत्तम दोनाडकर, पोलीस पाटील शकुंतला पत्रे, तंमुस अध्यक्ष विलास चौधरी, ग्रा. पं. सदस्य रघुनाथ राऊत, गुणवंत खरकाटे, वर्षा मातेरे, ग्रामसेविका वंदना वाढई, सपना ढवळे, शुभांगी सहारे, अनिता ढवळे, राजेंद्र ढवळे, विनोद सहारे उपस्थित होते. संचालन यशोदास ढवळे तर आभार चरण बांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समीर बांडे, दीपक बगमारे यांनी सहकार्य केले.
पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराजन कवंडर होते. यावेळी विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, किरण नेऊलकर, डाळिंबा उंदीरवाडे उपस्थित होते. संचालन गणेश गेडाम यांनी केले.
शिवाजी हायस्कूल, मौशिखांब : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए. आर. बावणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुभाष तोडासे, बोगा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संचालन लिकेश कोडापे यांनी केले.
कृषी महाविद्यालय, गडचिरोली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पुरूषोत्तम नेहारकर, डॉ. गणेश भगत, डॉ. शुभांगी अलेक्झांडर उपस्थित होत्या. कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी सरप, सरोदे, चौके, भोंगळे, मुरतेली, कावळे, आलोक उपाध्याय, जितेंद्र कस्तुरे, विनोद नलेगवार, प्रमोद भांडेकर, वामन भांडेकर, सुभाष ठाकरे, भोयर, रिंगनाथ भजभुजे यांनी सहकार्य केले.
आदर्श महाविद्यालय, देसाईगंज : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एच. एम. कामडी होते. यावेळी प्रा. प्रभाकर प्रधान, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, प्रा. निहार बोदेले उपस्थित होते. डॉ. कामडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच समता रॅलीही काढण्यात आली.
सिरोंचा : येथील अंकिसा मार्गावरील चौकात ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जंगम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, अधिवक्ता उंदीरवाडे, कोंडागोर्ला, चव्हाण, कस्तुरी दुर्गम, वाकडे, महेंद्र चव्हाण उपस्थित होते. सायंकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. त्यानंतर गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीत बहुसंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. संचालन श्याम रामटेके तर आभार रूपेश लाडे यांनी मानले.
जि. प. प्राथमिक शाळा, मारकबोडी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष माणिक मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून रोहिदास रामटेके, मुख्याध्यापक भैसारे, पोवरे, नंदेश्वर, सिद्धार्थ भैसारे उपस्थित होते. संचालन सानिका मेश्राम तर आभार दीक्षा बोरावार हिने मानले.
कुथे पाटील विद्यालय, गोठणगाव : कार्यक्रमाला प्राचार्य के. जे. बगमारे, पी. एम. मिसार, प्रा. मेश्राम, गजबे, भुरगाये, दिलीप कुथे, नीलेश राऊत, वघारे व कर्मचारी उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक शाळा, भाकरोंडी : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराचंद हजारे होते. यावेळी वैशाली मडावी, भाष्कर राऊत, प्रेमानंद इंदूरकर, दिवाकर तितीरमारे, रसुलखॉ पठाण, रेखा मेश्राम, हिरकन्या ढवळे, नरेश टेंभुर्णे, नरेंद्र टेंभुर्णे, यशवंत जनबंधू, माणिक जांभुळकर, फुलबांधे, गजभिये उपस्थित होते. जयंती निमित्ताने हस्ताक्षर, रांगोळी, भाषण स्पर्धा घेण्यात आली. यात अमिषा सहारे, रोहिनी सहारे, तृप्ती हजारे, दुष्यांत सहारे यांनी सुयश प्राप्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक जीवन शिवणकर, संचालन प्रभा चोपडे तर आभार शोभराय कोडाप यांनी मानले.
ग्राम पंचायत, गेवर्धा : अध्यक्षस्थानी सरपंच टिकाराम कोरेटी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच संदीप नखाते, रोशन सय्यद, निजामुद्दीन शेख, अशोक धाबेकर, कृष्णा मस्के, अविनाश भनारे, दिनेश कावळे, रहिम पठाण, रोशन टेंभुर्णे उपस्थित होते.
कर्मवीर विद्यालय, वासाळा : कार्यक्रमाला प्राचार्य पेंदोरकर, पर्यवेक्षक धंदरे, प्रा. रामटेके, पोईनकर, गायकवाड, मेश्राम, सिद्धार्थ शेंडे, सदानंद कुथे, स्वरूप तारगे, वालोदे, जोशी, बोरकर, कोटरंगे, देवराव सेलोटे, डंबा धंदरे, देवयाणी चंदनखेडे, यशवंत मडावी उपस्थित होते. संचालन निकुरे तर आभार शिखराम यांनी मानले.
ग्राम पंचायत, रांगी : ग्राम पंचायत व बौद्ध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जगदीश कन्नाके होते. यावेळी उपसरपंच नरेंद्र भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, शांताराम कोरेटी, फालेश्वरी गेडाम, अर्चना मेश्राम, ग्रामसेवक के. जी. नेवारे उपस्थित होते.
भामरागड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रसारक समितीच्या वतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान आयोजित सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाला प्राचार्य घोनमोडे, बी. के. वड्डे, व्ही. डब्ल्यू. इष्टाम, मनिराम पुंगाटी, झोडे, कसारे, राजे कदम उपस्थित होते. संचालन निमगडे तर आभार संतोष टेंभुर्णे यांनी मानले. यशस्वीतेसाठी श्रीकांत मोडक, किशोर कांबळे, निमसरकार, नाईक, मुरमाडे, गर्गम यांनी सहकार्य केले. सायंकाळी नागरिकांना भोजनदान करण्यात आले.
ग्राम पंचायत, कोरेगाव : कार्यक्रमाला सरपंच ममीता आळे, तंमुस अध्यक्ष देवचंद वैद्य, उपसरपंच जगदीश सहारे, जि. प. सदस्य पल्लवी लाडे, ग्रामविकास अधिकारी राऊत, प्राचार्य मुंगमोडे, मुख्याध्यापक कुमरे, सुरेश पर्वतकार, रमेश मेश्राम, संजय वाघाडे नरेश नेवारे, नंदू तुपटे, प्रशांत किलनाके उपस्थित होते.
किसान विद्यालय कोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामोद्धार शिक्षण प्रसारक मंडळाचे महासचिव दे. गो. चचाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे अध्यक्ष फागोजी मस्के, सचिव महेंद्र चचाणे, श्यामराव केळझरकर, प्राचार्य व्ही. एस. मुंगमोडे, अरूण राजगिरे, पर्यवेक्षक डी. एच. भावे, चंदू मडावी उपस्थित होते.
जि. प. हायस्कूल, मोहली : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. व्ही. साकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गहाणे, साळवे, बी. पी. राऊत, निवस्कर उपस्थित होते. संचालन नंदू किरंगे तर आभार पल्लवी पदा हिने मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस, गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संयुक्तरित्या साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सचिव खुशाल वाघरे, महिला शाखेच्या अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, मनीषा खेवले, प्रा. ऋषीकांत पापडकर, शंकरराव काळे, अरूण हरडे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार तर आभार शहर अध्यक्ष नितीन खोबरागडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशांत पोरेड्डीवार, तुकाराम पुरणवार, पुंडलिक चौधरी, वासुदेव मोहुर्ले, वासुदेव सहारे, वच्छला बारसिंगे, सुधाकर पाराशर, अंबादास जाधव, शंकर जवादे, देवराव खोबरे, सुभाष धाईत, गुरूदेव भोपये, रमेश बन्सोड, प्रकाश तुम्पल्लीवार, चंद्रकांत चन्नावार, नत्थूजी अंडेलकर, सय्यद गणी, विनोद चापले, किशोर बावणे, शेखर मडावी, नीलेश कोटगले, रवी किरमिरवार, रामचंद्र वाढई व कार्यकर्ते हजर होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Thousands of thousands of devotees honored with 'Jayabhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.