भामरागडातील हजारो क्विंटल धान भिजले

By Admin | Updated: August 30, 2015 01:04 IST2015-08-30T01:04:55+5:302015-08-30T01:04:55+5:30

आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने भामरागड येथील विविध कार्यकारी संस्थेने धान खरेदी केले होते.

Thousands of quintals of rice in Bhimragadha ran | भामरागडातील हजारो क्विंटल धान भिजले

भामरागडातील हजारो क्विंटल धान भिजले

पावसाळ्यात धानाची उचल : शासनाचे यावर्षीही कोट्यवधी रूपयांचे नुकसान
भामरागड : आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने भामरागड येथील विविध कार्यकारी संस्थेने धान खरेदी केले होते. सदर धान पावसाळ्यात उचल केली जात आहे. त्यामुळे धान उघड्यावर असल्याने सुरू असलेल्या पावसामुळे हजारो क्विंटल धान खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने यावर्षीच्या हंगामात सात हजार क्विंटल धान खरेदी केली होती. संपूर्ण उन्हाळा जाऊनही आदिवासी विकास विभागाने धानाची उचल केली नाही. पावसाळ्यात उचल करण्यास सुरूवात केली आहे. परिणामी धानावरील ताडपत्री काढण्यात आली आहे. ताडपत्री काढल्याने पावसाचे पाणी धानाच्या ढिगात शिरून यावर्षीसुध्दा हजारो क्विंटल धान खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी शासनाला कोट्यवधी रूपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thousands of quintals of rice in Bhimragadha ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.