हजारो नागरिकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

By Admin | Updated: February 21, 2015 01:12 IST2015-02-21T01:12:44+5:302015-02-21T01:12:44+5:30

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर.

Thousands of people took visions of asthma | हजारो नागरिकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

हजारो नागरिकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शन

वैनगंगेत झाले विसर्जन : ‘आबा अमर रहे’ च्या घोषणेने परिसर निनादला
गडचिरोली :
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे अस्थिकलश शुक्रवारी नागपूर येथून २.२० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात आणण्यात आले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आबांचे अस्थिकलश ठेवण्यात आले. दरम्यान हजारो नागरिकांनी त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले व पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
यावेळी प्रामुख्याने राकाँचे ज्येष्ठ नेते तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश बंग, राकाँचे नागपूर शहर अध्यक्ष अजय पाटील, राकाँचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य आ. प्रकाश गजभिये, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, प्रकाश ताकसांडे, शाम धाईत, बाबा हाशमी, जि.प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, खुशाल वाघरे,अरूण हरडे, नामदेव गडपल्लीवार, रविंद्र वासेकर, अशोक कत्रोजवार, ऋतूराज हलगेकर, संजय निखारे, चंद्रपूरचे राकाँचे प्रदेश सचिव वामनराव झाडे, सुनिल बेडगावकर, अविनाश राऊत, नानाजी बागडे, गिरीधर गुरपुडे, डॉ. नंदू मेश्राम, तुकाराम पुरणवार, प्रशांत पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. आरमोरी मार्गावरील पटवारी भवनासमोरून रथाच्या सहाय्याने भजन, दिंडीच्या स्वरात आबांचे अस्थिकलश इंदिरा गांधी चौकातून राकाँच्या कार्यालयात आणण्यात आले. यावेळी ‘आबा अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी श्रीनिवास गोडसेलवार, गोगावचे सरपंच नंदकुमार लाडे, विवेक चडगुलवार, अजय कुंभारे, रूपेश वलके, रविंद्र किरमिरवार, इरफान शेख, समिर नाथानी, अनिल खेवले, रामचंद्र वाढई, प्रा. अशोक लांजेवार, मनोज पवार, प्रविण मुक्तावरम, विवेक बाबनवाडे, भाजपच्या कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, मंजुषा विश्नोई, सुलोचना मडावी, वच्छला बारसिंगे आदी उपस्थित होते. त्यानंतर अस्थींचे विसर्जन मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापती अतुल गण्यारपवार, ज्ञानकुमारी कौशी, चंद्रपूरचे राकाँ अध्यक्ष राजेंद्र वैद्य व गडचिरोलीतील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of people took visions of asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.