हेमलकसात भरला हजारो रूग्णांचा महामेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:38 IST2016-01-10T01:38:21+5:302016-01-10T01:38:21+5:30
लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे रोटरी क्लब आॅफ नागपूर तथा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० जानेवारी या कालावधीत...

हेमलकसात भरला हजारो रूग्णांचा महामेळा
साडेतीनशे शस्त्रक्रिया होणार : नागपुरातून तज्ज्ञ डॉक्टर लोकबिरादरीत पोहोचले
भामरागड : लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे रोटरी क्लब आॅफ नागपूर तथा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० जानेवारी या कालावधीत विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे हेमलकसा येथे रूग्णांचा मोठा महामेळावाच भरला आहे.
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या पुढाकाराने दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. १९८५ पासून सदर कार्य सुरू आहे. यामध्ये रोटरी क्लब नागपूर यांचा सिंहाचा वाटा असून ४० ते ५० तज्ज्ञ डॉक्टरांची चमू हेमलकसात दाखल झाली आहे. विनामुल्य रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. दरवर्षी ३०० ते ३५० शस्त्रक्रिया केल्या जातात. छत्तीसगड, तेलंगणा राज्यासोबतच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही शेकडो रूग्ण हेमलकसात दाखल झाले आहेत. या महाआरोग्य शिबिरासाठी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे व्यवस्था सांभाळत आहेत. त्यांना संध्या येम्पलवार, बबन पांचाळ, गणेश हिवरकर, जगदिश बुरडकर, प्रकाश मायकरकार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, रमिला वाचामी आदी सहकार्य करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)