कासवीत घर जळून हजारोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:12 IST2018-04-22T01:12:08+5:302018-04-22T01:12:08+5:30

कासवी टोली येथे शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून घर जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले.

Thousands of burnt burns in tasty homes | कासवीत घर जळून हजारोंचे नुकसान

कासवीत घर जळून हजारोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/जोगीसाखरा : कासवी टोली येथे शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून घर जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले.
कासवी टोली नजीकच्या शेतात शुक्रवारी दुपारी १ वाजता अचानक आग लागली. आगीने विक्राळ रूप धारण केले. त्यामुळे लगतच्या नलिनी अनिल मेश्राम यांच्या घरापर्यंत आगीच्या झळा पोहोचल्या. अचानक घरालाही आग लागली. त्यामुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यात त्यांचे ५० हजार रूपयांवर नुकसान झाले आहे. घरातील महिला-पुरूष व मुले घराबाहेर गेले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. घटनेचा पंचनामा तलाठी पुरेटी यांनी केला.

Web Title: Thousands of burnt burns in tasty homes