शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:49 AM

दीड वर्षांपासून कनेक्शन देणे बंद जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही ...

दीड वर्षांपासून कनेक्शन देणे बंद

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही योजना शासनाने गुंडाळली की काय, असे चित्र होते. एवढेच नाहीतर जिल्हा पुरवठा विभागाकडे याेजनेची पुरेशी माहितीसुद्धा आजघडीला नाही. चंद्रपूर येथे बसणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याकडेच त्याबाबतची सर्व माहिती असल्याचे सांगण्यात आले. त्या अधिकाऱ्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतरही संबंधित अधिकारी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत.

यापूर्वी ६७६४ जणांनी उज्ज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केले होते. गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे गॅसचा हंडा भरून न घेणाऱ्यांची संख्या आता १० हजारांच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी गॅसच्या हंड्यासाठी गोदाम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हंडा भरून आणण्यासाठी अजून अतिरिक्त पैसे माेजावे लागतात. त्यामुळे अनेकांनी रिफिल करणे सोडले.

प्रतिक्रिया

सिलिंडरचे भाव तर वाढलेच, पण सबसिडीही मिळत नाही. जेमतेम ४० रुपये बँकेत जमा होते. अगोदर सिलिंडरचे भाव कमी होते आणि सबसिडीही देत होते. आता भाव वाढविले आणि सबसिडी कमी केली. म्हणून आता नियमित गॅस वापरणे कठीण झाले आहे. नाईलाजाने चूल पेटवावी लागत आहे.

- प्रणाली पाथोडे, गडचिरोली

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सुरुवातीला ३०० ते ३५० रुपयापर्यंत होते. आता दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करणे सुरू केले आहे. थोडा त्रास होत असला तरी चुलीवरचा स्वयंपाक परवडतो. गोरगरिबांचा विचार करून भाव कमी केले तर पुन्हा गॅस वापरू.

- राजकुमारी सुरेश मेश्राम, कोरची

गॅसचे भाव आता गोरगरिबांच्या आवाक्यात राहिले नाहीत. चुलीवरचा त्रास परवडला, पण गॅसचे भाव नाही परवडत. उज्ज्वला योजनेतून गॅस भेटला, पण सिलिंडर भरून आणण्यासाठी तर पैसे द्यावेच लागणार ते कुठून आणायचे, फक्त गॅसच नाही बाकीचा पण खर्च वाढला आहे. मग कुठेतरी बचत करावी लागेल ना?

- शकुंतला कोटेश, ताल्लापेल्ली, ता.सिरोंचा

सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा खूप त्रास होत होता. मोदी सरकारने प्रदूषणमुक्त वातावरणासोबत महिलांना चूल पेटविण्याचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस दिले. ३५० रुपयांत गॅस मिळत होता. आज ८३५ रुपयांत घ्यावा लागतो. एवढ्या महागाचा गॅस वापरणे परवडणार आहे का?

- कमला तिलक मडावी, कोरची

गॅस सिलिंडरचे भाव ७८५ ते ८३५ झाले आहेत. त्यामुळे सिलिंडर घेणे आम्हाला आता कठीण झाले आहे. त्याचबरोबर जंगलातून लाकडे आणणेसुद्धा कठीण झाले आहे. वनविभाग लाकडे घेऊ देत नाही. मग गोरगरिबांनी चूल कशी पेटवायची, याचे उत्तर सरकारने द्यावे.

- सोनी प्रवीण पुद्दटवार, अंकिसा (ता.सिरोंचा)