शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:00 AM

उज्ज्वला गॅस योजनेतून शहराच्या ग्रामीण भागापर्यंत एकूण २० हजार ८३३ कुुटुंबांमध्ये पहिल्यांदाच गॅस कनेक्शन मिळाले होते. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचण्यासाठी गावोगावी गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात आले. अर्थात नंतरच्या रिफिलिंगमध्ये शेगडी आणि हंड्याचे पैसे जोडण्यात आले. अनेक घरी गॅस कनेक्शन कायम आहे, पण सिलिंडर रिकामे पडून आहे.

ठळक मुद्देगॅस सिलिंडर आवाक्याबाहेर, सरकारने दिलेले हंडे गावोगावी रिकामे पडून

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोरगरीब कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना आणली. कमी उत्पन्न गटातील कुटुंबात या योजनेतून गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्यातील २० हजारांवर गृहिणींना मोठा दिलासा दिलाख पण आता गॅसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गॅसचा हंडा घेणे अनेक कुटुंबांसाठी अशक्य होत आहे. परिणामी घरात गॅस कनेक्शन असूनही ६७६४ कुटुंबीयांनी चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे. उज्ज्वला गॅस योजनेतून शहराच्या ग्रामीण भागापर्यंत एकूण २० हजार ८३३ कुुटुंबांमध्ये पहिल्यांदाच गॅस कनेक्शन मिळाले होते. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचण्यासाठी गावोगावी गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात आले. अर्थात नंतरच्या रिफिलिंगमध्ये शेगडी आणि हंड्याचे पैसे जोडण्यात आले. अनेक घरी गॅस कनेक्शन कायम आहे, पण सिलिंडर रिकामे पडून आहे.

दीड वर्षांपासून नवीन कनेक्शन देणे बंद

जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही योजना शासनाने गुंडाळली की काय, असे चित्र आहे. चंद्रपूर येथे बसणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतरही संबंधित अधिकारी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत. यापूर्वी ६७६४ जणांनी उज्ज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केले होते. गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे हंडा भरून न घेणाऱ्यांची संख्या आता १० हजारांच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी गॅस रिफिलिंग केलेले हंडे मिळण्याची सुविधा आहे.

चुलीवरचा त्रास परवडला पण महागडा गॅस नकाे

सिलिंडरचे भाव तर वाढलेच, पण सबसिडीही मिळत नाही. जेमतेम ४० रुपये बँकेत जमा होते. अगोदर सिलिंडरचे भाव कमी होते आणि सबसिडीही देत होते. आता भाव वाढविले आणि सबसिडी कमी केली. म्हणून आता नियमित गॅस वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने लाकडे जाळून चूल पेटवावी लागत आहे.- प्रणाली पाथोडे, गडचिरोली

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सुरुवातीला ३०० ते ३५० रुपयापर्यंत होते. आता दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करणे सुरू केले आहे. थोडा त्रास होत असला तरी चुलीवरचा स्वयंपाक परवडतो. गोरगरिबांचा विचार करून भाव कमी केले तर पुन्हा गॅस वापरू.- राजकुमारी सुरेश मेश्राम, कोरची

गॅसचे भाव आता गोरगरिबांच्या आवाक्यात राहिले नाहीत. चुलीवरचा त्रास परवडला, पण गॅसचे भाव नाही परवडत. उज्ज्वला योजनेतून गॅस भेटला, पण सिलिंडर भरून आणण्यासाठी तर पैसे द्यावेच लागणार ते कुठून आणायचे, फक्त गॅसच नाही बाकीचा पण खर्च वाढला आहे. मग कुठेतरी बचत करावी लागेल ना?- शकुंतला कोटेश, ताल्लापेल्ली, ता.सिरोंचा

सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा खूप त्रास होत होता. मोदी सरकारने प्रदूषणमुक्त वातावरणासोबत महिलांना चूल पेटविण्याचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस दिले. ३५० रुपयांत गॅस मिळत होता. आज ८३५ रुपयांत घ्यावा लागतो. एवढ्या महागाचा गॅस वापरणे परवडणार आहे का? - कमला तिलक मडावी, कोरची

गॅस सिलिंडरचे भाव ७८५ ते ८३५ झाले आहेत. त्यामुळे सिलिंडर घेणे आम्हाला आता कठीण झाले आहे. त्याचबरोबर जंगलातून लाकडे आणणेसुद्धा कठीण झाले आहे. वनविभाग जंगलातील लाकडे घेऊ देत नाही. मग गोरगरिबांनी चूल कशी पेटवायची, याचे उत्तर सरकारने द्यावे.- सोनी प्रवीण पुद्दटवार, अंकिसा (ता.सिरोंचा)

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर